पणजी : जॅक दी सिक्वेरा यांची आज १०० वी जयंती साजरी करणे योग्यच आहे. जनमत कौलाच्या वेळचे ते एक महत्त्वाचे नेते होते याबाबत दुमत नाही; पण त्यांना जनमत कौलाचे जनक म्हणता येणार नाही आणि सचिवालय परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचीही गरज नाही, असे अॅड. उदय भेंब्रे, नागेश करमली आणि अरविंद भाटीकर यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, युनायटेड गोवन्स पक्षाचा पाया अल्वारो लोयोला फुर्तादो यांनी रोवला. त्या वेळी हा पक्ष फार छोटा होता, तर राज्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष प्रबळ होता. सर्व स्तरांवर काम करण्याच्या कौशल्यामुळे फुर्तादो यांनी जॅक दी सिक्वेरा यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली. त्या वेळी प्राथमिक गोव्यातील कॅथलिक यांचा युनायटेड गोवन्स पक्ष म्हणून ओळखला जात होता. या पक्षात काही हिंदू नेतेही सहभागी झाले होते. शिवाय मराठी राष्ट्रमतनेही या पक्षाला पाठिंबा दिला. पुरुषोत्तम काकोडकर, काँग्रेस पक्षाचे अॅड. मुळगावकर हे गोव्याची वेगळी ओळख जपण्यासाठी झटत होते. यावरून सिक्वेरा यांचा पुतळा सचिवालय परिसरात गरजेचा नाही. युनायटेड गोवन्स पक्षाची स्थापना १९६३ मध्ये झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ पासून गोवा हे केंद्रशासित राज्य ठेवले आणि येथील जनतेने आपले भविष्य निश्चित करावे, असे त्यांनी त्या वेळी म्हटले होते. राजन नारायण आणि शेरॉन डिक्रुझ यांनी आपल्या ‘थ्रम्प आॅफ सेक्युलरिझम’ या पुस्तकात गोव्यातील हा जनमत कौलाचा इतिहास लिहिला आहे. गोव्याची लोकसंख्या लक्षात घेतली असता ६५ टक्के हिंदू आणि ३५ टक्के ख्रिश्चन होते. तरीही जनमत कौल फक्त ख्रिश्चन मतांवर जिंकला नाही, तर दैनिक राष्ट्रमत, काँग्रेसचे काही नेते, शाबू देसाई, उल्हास बुयांव यांच्यासारखे त्यावेळचे युवक झटले. शिवाय हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात जनमत कौलाच्या बाजूने मतदान केले, असेही या निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)जॅक दी सिक्वेरा जनमत कौलाचे जनक नव्हेपणजी : जॅक दी सिक्वेरा यांची आज १०० वी जयंती साजरी करणे योग्यच आहे. जनमत कौलाच्या वेळचे ते एक महत्त्वाचे नेते होते याबाबत दुमत नाही; पण त्यांना जनमत कौलाचे जनक म्हणता येणार नाही आणि सचिवालय परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचीही गरज नाही, असे अॅड. उदय भेंब्रे, नागेश करमली आणि अरविंद भाटीकर यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, युनायटेड गोवन्स पक्षाचा पाया अल्वारो लोयोला फुर्तादो यांनी रोवला. त्या वेळी हा पक्ष फार छोटा होता, तर राज्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष प्रबळ होता. सर्व स्तरांवर काम करण्याच्या कौशल्यामुळे फुर्तादो यांनी जॅक दी सिक्वेरा यांच्याकडे पक्षाची जबाबदारी दिली. त्या वेळी प्राथमिक गोव्यातील कॅथलिक यांचा युनायटेड गोवन्स पक्ष म्हणून ओळखला जात होता. या पक्षात काही हिंदू नेतेही सहभागी झाले होते. शिवाय मराठी राष्ट्रमतनेही या पक्षाला पाठिंबा दिला. पुरुषोत्तम काकोडकर, काँग्रेस पक्षाचे अॅड. मुळगावकर हे गोव्याची वेगळी ओळख जपण्यासाठी झटत होते. यावरून सिक्वेरा यांचा पुतळा सचिवालय परिसरात गरजेचा नाही. युनायटेड गोवन्स पक्षाची स्थापना १९६३ मध्ये झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ पासून गोवा हे केंद्रशासित राज्य ठेवले आणि येथील जनतेने आपले भविष्य निश्चित करावे, असे त्यांनी त्या वेळी म्हटले होते. राजन नारायण आणि शेरॉन डिक्रुझ यांनी आपल्या ‘थ्रम्प आॅफ सेक्युलरिझम’ या पुस्तकात गोव्यातील हा जनमत कौलाचा इतिहास लिहिला आहे. गोव्याची लोकसंख्या लक्षात घेतली असता ६५ टक्के हिंदू आणि ३५ टक्के ख्रिश्चन होते. तरीही जनमत कौल फक्त ख्रिश्चन मतांवर जिंकला नाही, तर दैनिक राष्ट्रमत, काँग्रेसचे काही नेते, शाबू देसाई, उल्हास बुयांव यांच्यासारखे त्यावेळचे युवक झटले. शिवाय हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात जनमत कौलाच्या बाजूने मतदान केले, असेही या निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
चर्चच्या जागेवर खासगी वसाहत
By admin | Published: April 20, 2015 1:24 AM