लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव: नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. देशाची प्रगती झाली तशीच संगीताचीही प्रगती झाली. आता घराघरांतून संगीत वाजवले जाते आणि गायक गात राहतात, ही गोष्ट पटत नसली तरी स्वीकारावी लागते, असे नामवंत संगीतकार अशोक पत्की यांनी सांगितले.
मडगावातील निकेतनच्या गोमंत विद्या विचारवेध व्याख्यानमालेत रविवारी 'जनप्रिय त्यांची मुलाखत प्रख्यात सूत्रनिवेदक अजय वैद्य यांनी घेतली. जितेंद्र अभिषेकीबुवांचा प्रभाव आपल्यावर आहे. ते म्हणायचे, मुखडा सणसणीत झाला पाहिजे. ७० गाणी प्रशांत दामलेसोबत केली, असे सांगून पत्की यांनी 'सुख म्हणजे काय असतं' तसेच या गाण्याचे दुसरे रूप सादर करून दाखवले. 'मोरूची मावशी या नाटकातील गाणीही त्यांनी सादर केली. पार्श्वसंगीतासाठी फारसे कोणी खर्च करत नाही, अशी खंत पत्की यांनी व्यक्त केली.
अनेक पारितोषिके प्राप्त झाली. पुढे काम करण्याची पद्धत बदलत गेली. मूडभोवती सगळे फिरत असते. 'काल रात्री स्वप्नामध्ये' हे गाणे रचले, मुखडा तयार केला. त्यामुळे अर्धवट कवी असे नाव पडले. त्यानंतर सुरेश वाडकर यांच्यामुळे पूर्ण कवी झालो. स्वप्निल बांदोडकर यांनी आपल्याकडून गाणे रचून घेतले ते म्हणजे 'राधा ही बावरी' अवधूत गुप्ते यांनीही त्याला दाद दिली आणि आज १२-१३ वर्षे झाली, तरी हे गाणे खूप चालत आहे, असे त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल बोलताना सांगितले आज गाणी दुरुस्त करायला येतात, असे ते म्हणाले.
'हाजी हाजी करायला गेलो नाही' कामे चालत आली. त्यामुळे हिंदीमध्ये हाजी हाजी करतं गेलो नाही आणि ते करणे आवडतही नाही, असे पत्की यांनी सांगितले.' 'ब्रहाचारी'मधील यमुना जळी खेळ खेळू हे जुने आणि नवे गाणे त्यांनी यावेळी सादर केले. पालखी उतरूनी ठेवा'चा किस्सा सांगत गाणे सादर केले.
'शीर्षकगीते पुढे जाणार'
शीर्षकगीते देण्यास ७२ साली सुरुवात झाली. हिंदी गाण्यांतून सुरुवात केली. बीज अंकुरे अंकुरे, आभाळ माय, वादळवाट यांचा त्यात समावेश राहिला. भातुकलीच्या खेळामधली...अधुरी एक कहाणी या गाण्याची चाल बदलायला लावली होती. तेव्हा अरुण दाते यांनी मिठी मारून दाद दिली. अजूनही 'झी'वर शीर्षकगीते देतो, पण पुढे ती बंद होणार. आर्थिक बदल यास कारणीभूत ठरणार आहे, असे पत्की यांनी सांगितले.
जिंगल्समध्ये वेळ महत्त्वाची
जिंगल्स ५००० हून अधिक रचलेली आहेत. हिंदी जिंगल्सचाही समावेश आहे, यामध्ये वेळ खूप महत्वाची असते. उदाहरणार्थ १०, २० सेकंद हाती असतात. पूर्वीची कित्येक जिंगल्स आजही आठवतात, पण आताची आठवणीत राहत नाही. कारण व्यवहार झालेला आहे, असे पत्की म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"