शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

ओसीआय कार्डसाठी पासपोर्ट जमा केल्याचा दाखला पुरेसा; गृहमंत्री अमित शाहांकडून फाइल मंजूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2024 13:36 IST

गोमंतकीयांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट जमा केल्याचा दाखला पुरेसा असून यासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फाइल मंजूर करून पोर्तुगीज पासपोर्टधारक मूळ गोमंतकीयांना मोठा दिलासा दिला आहे.

पासपोर्ट जमा केल्याच्या दाखल्याच्या आधारावर आता ओसीआय कार्ड किंवा विदेशी जाण्याचा व्हिसा मिळू शकेल. ओसीआय कार्डच्या बाबतीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ४ एप्रिल रोजी काढलेल्या निवेदनाच्या बाबतीत मध्यंतरी शुद्धीपत्रक जारी केल्याने गोंधळ निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. हा गोंधळ आता दूर झाला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्रीट करून ही माहिती देताना याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांचे आभार मानले आहेत. निवडणुकीत जी आश्वासने दिली होती ती आता परिपूर्ण केली जात आहे. मोदी की गॅरंटी चालूच राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

ओसीआय कार्डासाठी अर्ज करताना आता पर्यायी दस्तऐवज म्हणून भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचा दाखला जोडता येईल. पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकीयांसाठी फार मोठी अडचण निर्माण झाली होती. गोवा सरकारने हा विषय केंद्र सरकारकडे नेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती.

पासपोर्ट जमा केल्यानंतर ओसीआय कार्ड मिळविण्यात गोमंतकीयांना अडचणी येत होत्या. पोर्तुगालात जन्म नोंदणी झाली म्हणून भारतीय पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाने रद्द करू नये, अशी मागणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनीही राज्यसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती.

पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी असल्यामुळे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याचे प्रकार गोव्यात झाले आहेत. याचा अनेक गोमंतकीयांना फटका बसला आहे. पोर्तुगालात जन्म नोंदणी झाली म्हणून सुमारे ७० जणांचे पासपोर्ट रद्द केलेले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातले: आलेक्स सिक्वेरा

पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा म्हणाले की, या प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच तत्कालीन केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना मुख्यमंत्र्यांसह भेटलेल्या शिष्टमंडळात मीही होतो. मुख्यमंत्री सावंत यांनी जातीने लक्ष घालून याविषयी पाठपुरावा केला. ९ रोजी केंद्रात मोदी सरकार स्थापन झाले व ११ रोजी आदेश काढण्यात आला. पोर्तुगीज पासपोर्टधारक मूळ गोमंतकीयांना यामुळे ओसीआय कार्ड मिळवण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

नोकरीसाठी नागरिकता सोडून विदेशात जाणाऱ्यांना ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) ओळखपत्र मिळविण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धन्यवाद दिले आहेत. नागरिकता सोडण्याचे प्रमाणपत्रच ओसीआय कार्ड मिळविण्याचे साधन करण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयामुळे अनेक गोमंतकीयांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत होतो. शेवटी या प्रयत्नांना यश मिळाले. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही त्यांनी धन्यवाद दिले आहेत. -आलेक्स रेजिनाल्ड, आमदार कुडतरी

ओसीआय प्रकरणात एकूण पाच याचिका उच्च न्यायालयात सादर झाल्या होत्या, त्या सर्व पाच निकालात काढण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोघांच्या केसेस अशा होत्या की, त्यांनी ओसीआय कार्डसाठी अर्ज केले होते; परंतु त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द झाल्यामुळे त्यांचे अर्ज फेटाळले होते. आता केंद्र सरकारच्या नवीन आदेशानुसार ओसीआय ओळखपत्र मिळविण्याबाबत स्पष्टता आली आहे. पासपोर्ट रद्द झाल्याची पावतीच ओसीआय कार्ड मिळविण्यासाठी साधन बनले आहे. त्यामुळे विदेशात नोकरी करीत असलेल्या गोमंतकीय युवकांना दिलासा मिळणार आहे. - प्रवीण फळदेसाई, उपसॉलिसीटर जनरल ऑफ इंडिया

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतAmit Shahअमित शाहpassportपासपोर्ट