वास्को: सागर परिक्रमाच्या अंतर्गत शुक्रवारी (दि.१९) केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री परषोत्तम रुपाला यांनी देस्तेरो - बायणा, वास्को भागातील मासेमारी बांधवांची भेट घेऊन त्यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. गेल्या ४० वर्षापासून असलेल्या खारीवाडा मासेमारी जेटीचे दुरूस्तीकरण, वाढवीकरण आणि तेथे विविध साधनसुविधा वाढवण्याची मासेमारी बांधवांची मागणी आहे. ह्या विषयात मी गोवा सरकार, मासेमारी विभाग आणि एमपीए (मुरगाव पोर्ट अथोरेटी) चेअरमनशी योग्य चर्चा करून मासेमारी बांधवांच्या विविध समस्या सोडवून त्यांच्या हीताच्या दृष्टीने उचित पावले उचलणार असल्याचे केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री परषोत्तम रुपाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शुक्रवारी केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री परषोत्तम रुपाला यांनी देस्तोरो बायणा, वास्को येथील मासेमारी बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्याबरोबर गोव्याचे मत्स्योद्योगमंत्री निळकंठ हळणकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, गोव्याचे माजी महसूलमंत्री जुझे फीलीप डीसोझा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मासेमारी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्या दूर करण्यासाठी आपण उचित पावले उचलणार असल्याचे आश्वासन रुपाला यांनी मासेमारी बांधवांना दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सागर परिक्रमाच्या अंतर्गत मी गोव्यात आल्यानंतर नुकतीच खारीवाडा, वास्को मासेमारी जेटीला भेट दिल्याची माहीती त्यांनी दिली.
४० वर्षापासून खारीवाडा जेटीवर मासेमारीचा व्यवसाय होत आहे. ह्या मासेमारी जेटीची दुर्दक्षा झालेली असून त्याची दुरूस्त करण्यात यावी अशी मासेमारी बांधवांची मागणी आहे. तसेच मासेमारी बांधवांच्या हीतासाठी जेटीचे वाढवीकरण करण्याबरोबरच तेथील साधनसुविधेत वाढ करावी अशी मागणी वास्कोतील मासेमारी बांधवांनी केल्याची माहीती रुपाला यांनी दिली. वास्कोतील मासेमारी बांधवांच्या हीतासाठी मी हा विषय गोवा सरकार, मत्स्योद्योग विभाग आणि एमपीए चेअरमनशी चर्चेला आणून मासेमारी बांधवांच्या हीताच्या दृष्टीने उचित पावले उचलणार असल्याचे रुपाला यांनी सांगितले. गोव्याचे मत्स्योद्योगमंत्री निळकंठ हळणकर यांनी सागर परिक्रमा अंतर्गत केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री परषोत्तम रुपाला यांनी येथील विविध मासेमारी बांधवांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे सांगितले. गोव्यातील मासेमारी बांधवांच्या विविध समस्या दूर करण्यासाठी आणि येथील मासेमारी बांधवांच्या हीतासाठी केंद्रीयमंत्री रुपाला नक्कीच उचित पावले उचलणार असा विश्वास निळकंठ हळणकर यांनी व्यक्त केला. केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री परषोत्तम रुपाला यांनी शुक्रवारी देस्तोरो बायणा येथील मासेमारी बांधवांना भेटून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या उपस्थितीत मासेमारी बांधवांनी त्यांच्या विविध समस्या मांडणारे निवेदन केंद्रीयमंत्री रुपाला यांना सादर करून आमच्या समस्या दूर कराव्या अशी मागणी केली.
देस्तेरो, बायणा भागातील अनेक मासेमारी बांधव समुद्र किनाऱ्याजवळ राहत असून त्यांना पुन्हा पुन्हा घरे जमिनदोस्त करण्याची नोटीस येत असल्याची माहीती आमदार संकल्प आमोणकर यांनी पत्रकारांना दिली. मासेमारी बांधव व्यवसायासाठी कीनाºया जवळच राहणार असे आमोणकर यांनी सांगून येथील मासेमारी बांधवांच्या घरांच्या हीतासाठी उचित पावले उचला अशी मागणी केंद्रीय मंत्र्यासमोर केल्याचे आमोणकर यांनी सांगितले. तसेच देस्तेरो बायणा येथील मासेमारी बांधवांसाठी नेट (जाळे) बेंन्डींग शॅडची, लोडींग अनलोडींग पोइटची सुविधा उपलब्ध नाही. येथे मासेमारी बांधवांना ‘ब्रेक वॉटर’ ची सुविधा उपलब्ध नसल्याने पावसाळ््यात त्यांना दुसºया ठीकाणी नौका समुद्रात नांगरून ठेवाव्या लागतात अशी माहीती आमोणकर यांनी देऊन येथील मासेमारी बांधवांच्या हीतासाठी उचित पावले उचला अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांशी केल्याचे सांगितले.
केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री रुपाला यांनी देस्तेरो बायणा येथील मासेमारी बांधवांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी उचित पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहीती आमोणकर यांनी पत्रकारांना दिली. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री परषोत्तम रुपाला यांनी वास्कोतील मासेमारी बांधवांच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी उचित पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.