पणजी : खानिज उद्योजक राधा तिंबले यांचा मुलगा रोहन तिंबले यांची गोव्यातील ३६.८० कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) जप्त करण्यात आली आहे. तिंबलो यांची किनारी भागातील ३६.८० कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे आणि त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे असे इडीकडून शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. पेंडोरा पेपर लीक प्रकरणातील तपासाचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. इडीकडून रोहन तिंबले यांच्या केलेल्या तपासातून बरेच काही उघड झाले आहे. त्याच्या सिंगापूर येथील एशियासिटी ट्रस्टच्या तीन कंपन्या आहेत. काल्हेटा होल्डिंग्स लिमिटेड, सामोआ सेझार फायनान्स एस ए बीव्ही आय आणि कोरिलस एसेट्स अशी त्यांची नावे आहेत. त्या आता इनलँड रेव्हेन्यू अथॉरिटी ऑफ सिंगापूरच्या (आयआरएएस) स्कॅनरखाली आल्या आहेत. या कंपन्यात ते स्वत: त्यांची पत्नी आणि मुलगा असे तिघे लाभार्थी आहेत.
रोहनच्या एशियासिटी ट्रस्ट सिंगापूर प्रा. लिमिटेड ने स्वत:च एक लाभार्थी असलेल्या कॉलरेस ट्रस्टला कॉर्पोरेट ट्रस्टला सेवा प्रदान केल्या होत्या. त्यांच्या ट्रस्टची भांडवली गुंतवणूक होती ३७.३४ कोटी रुपये. परंतु याची माहिती त्यांनी भारत सरकारला दिली नाही. त्यामुळे फेमा कायद्याचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मोठी रक्कम महसुलाच्या रुपाने जी भारत सरकारला येणे होती ती आली नाही. त्यामुळे इडीने ही कारवाई केली आहे.