शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारीत जागतिक, सॅपेकटॅक्रो स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 8:21 PM

गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारी ७ ते १४ या दरम्यान जागतिक सॅपेकटॅक्रो स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आज दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील सोयी सुविधांची पाहणी आंतरराष्ट्रीय सॅपेकटॅक्रो महासंघाचे सरचिटणीस अब्दुल हलिम बीन कादर व त्यांच्या पथकाने केली. येथील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पणजी : गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारी ७ ते १४ या दरम्यान जागतिक सॅपेकटॅक्रो स्पर्धा भरविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आज दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील सोयी सुविधांची पाहणी आंतरराष्ट्रीय सॅपेकटॅक्रो महासंघाचे सरचिटणीस अब्दुल हलिम बीन कादर व त्यांच्या पथकाने केली. येथील सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ही जागतिक चषक स्पर्धा भरविण्यासाठी चीन, मंगोलिया, इराण हे देशही शर्यतीत आहेत. 

अखिल भारतीय सॅपेक टॅक्रो महासंघाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष या नात्याने बोलताना विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले की, गोव्यात ही स्पर्धा भरविण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधाही ब-यापैकी येथे आहेत. क्रीडामंत्री बाबू आजगांवकर यांनी या स्पर्धेला सरकारतर्फ आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी दिली आहे. 

कादर म्हणाले की, कमीत कमी ३ हजार आसन क्षमता, दिव्यांची पुरेशी व्यवस्था तसेच एकूणच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा जागतिक स्पर्धा भरविण्यासाठी लागतात. त्यादृष्टिने दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम परिपूर्ण आहे. या स्टेडियममध्ये तीन भागात या स्पर्धा खेळवल्या जाऊ शकतात. 

भारतात आणि गोव्यातही सॅपेकटॅक्रो खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. आशियाई सॅपेकटॅक्रो स्पर्धेत भारताच्या पथकाला पदक मिळाले. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये या खेळाचा मोठा इव्हेंट झाला तेथेही भारतीय संघाने चमक दाखवली. २0१९ साली होऊ घातलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १६ ते २0 देश सहभागी होतील. सिंगापूरसह जपान, चीन, कंबोडिया, इंडोनेशिया, श्रीलंका, भारत आदी देश या खेळाबद्दल विशेष अभिरुची दाखवत आहेत. 

भारतीय सॅपेक टॅक्रो महासंघाचे सरचिटणीस योगेंद्र दहिया म्हणाले की, गोवा सरकारने वेळोवेळी या खेळासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. येथील सोयी, सुविधांची आम्ही पाहणी केली असून त्या समाधानकारक आहेत. क्रीडा खात्याचे संचालक व्ही. एम. प्रभूदेसाई यांनीही चांगले सहकार्य दिले आहे. मिरामार किना-यावर चार ते पाच देशांमधील संघांना निमंत्रित करुन सॅपेक टॅक्रो खेळाची प्रात्यक्षिकेही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सॅपेक टॅक्रो संघटनेचे सचिव सुरज देसाई तसेच इतर पदाधिकारी पत्रकार परिषदेस उपस्थित होते. 

टॅग्स :goaगोवाSportsक्रीडा