शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

भरती प्रक्रिया लांबल्याने भावी शिक्षक वैतागले; १४२ उमेदवार प्रतीक्षेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 10:24 AM

डिसेंबरपर्यंत निर्णय लागण्याची शक्यता.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : शिक्षण खात्याकडून प्राथमिक शिक्षक भरती करण्याबाबत डिसेंबर २०२१ मध्ये जाहिरात दिली होती. राज्यभरात शिक्षकांच्या १४२ पदांसाठी प्राथमिक शिक्षण खात्याने ही जाहिरात दिली होती. अर्जदार उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन उत्तीर्ण झालेल्यांची नावे शिक्षण खात्याने जारी केली होती. पण, आता शिक्षकांना सेवेत रुजू करून घेण्यासाठी आणखी दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे ही भरती ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

निकाल लागून आता महिने उलटले आहेत. तरीही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या शिक्षकांच्या पदांच्या अगोदर याच खात्यात आलेली कारकून पदे भरली जाणार असल्याची महिती मिळाली आहे. राज्यात सध्या शिक्षकांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने लवकरात लवकर ही पदे भरणेही गरजेचे आहे. पण, अजूनही याचे सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत.

परीक्षा कधी झाली?

शिक्षण खात्याने २०२१ मध्ये जाहिरात दिली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्याने गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये या उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या. त्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल जारी झाला. मात्र, आता तीन महिने उलटले तरी पुढील प्रक्रिया न झाल्यामुळे उमेदवारांत नाराजीचा सूर आहे.

स्वप्नपूर्तीपासून एक पाऊल दूर

पात्र उमेदवारांनी मोठ्या उमेदीने अर्ज केले होते. मेहनतीने परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. पण, खात्याने तांत्रिक अडचणीमुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर ठेवली आहे. त्यामुळे काही भावी शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही मोठ्या अडचणीवर मात करून परीक्षा दिल्या आहेत. सरकारने आता हलगर्जीपणा न करता पारदर्शकपणे योग्य उमेदवारांची भरती करावी, असे काही उमेदवारांनी सांगितले.

का रखडली भरती?

भरती लवकर करण्यासाठी काय अडचण येत आहे हेही अजून शिक्षण खात्याने स्पष्ट केलेली नाही. या पदांसोबत कारकून तसेच इतर पदेही रिक्त आहेत. शिक्षकांची पदे खूप आहेत. त्यामुळे अर्जांची योग्य छाननी होणे गरजेचे आहे. तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे ही भरती प्रक्रिया पुढे गेली आहे. ती लवकरच भरली जाणार आहे, असेही खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

 

टॅग्स :goaगोवाTeacherशिक्षक