पणजी : निवडणुकीच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या सुमारे १७ हजार कर्मचाऱ्यांचे (सेवा मतदार) मतदान अजून व्हायचे असताना सरकार आचासंहिता शिथिल करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने काही राजकीय पक्षांनी त्यास जोरदार हरकत घेतली आहे. सेवा मतदारांना मतदानासाठी ११ मार्च रोजी पहाटेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करता येणार नाही, असे या पक्षांचे म्हणणे आहे. आचारसंहितेमुळे विकासकामे रखडली आहेत. तसेच महत्त्वाच्या फाइल्सही हातावेगळ्या करता येत नाहीत, अशी खंत अलीकडेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)
आचारसंहिता शिथिल करण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 1:51 AM