पणजी: सांतआंद्रे मतदारसंघात बेकायदेशीरपणे डोंगरकापणी करुन मोठमोठे प्रकल्प उभारले जात आहे. पर्यावरणाची हानी करुन उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पांना नगरनियोजन खाते (टीसीपी)परवानगी देत असल्याचा आराेप करुन आमदार विरेश बोरकरांसह रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजी)च्या कार्यकर्त्यांनी पाटो पणजी येथील खात्याच्या कार्यालयात शुक्रवारी ठिय्या मांडल्या.
टीसीपी अधिकाऱ्यांनी यावेळी सांतआंद्रेतील या प्रकल्पांबाबतच्या फाईंल्स तसेच दिलेल्या परवानगी दाखवण्यास नकार दिल्याने आमदार बोरकर चांगलेच भडकले. जो पर्यंत आम्हाल परवानगी दाखवली जात नाही, तो पर्यंत कार्यालयातून हटणार नसल्याचे स्पष्ट करुन तेथेच आंदोलनाला सुरुवात केली.
यावेळी आरजी कार्यकर्ता अजय खोलकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. सांतआंद्रेते मेगा प्रकल्प उभारले जात आहेत. सर०हासपणे डोंगरकापणी करुन हे प्रकल्प उभे रहात आहेत. याविरोधात वारंवार तक्रार करुनही टीसीपी खाते मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पर्यावरण नष्ट करुन केला जाणारा विकास आम्हाला नको असेही त्यांनी स्पष्ट केले.