शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

धावपट्टीच्या डागडुजीसाठी विमानसेवा बंद ठेवण्याला गोव्यात विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 9:27 PM

गोवा विमानतळ दुरुस्तीसाठी काही वेळ बंद ठेवण्याच्या नौदलाच्या निर्णयामुळे या विमानतळाच्या उपयुक्ततेविषयी पुन्हा एकदा शंका व्यक्त करण्यात येत आहेत.

- राजू नायकपणजी - गोवाविमानतळ दुरुस्तीसाठी काही वेळ बंद ठेवण्याच्या नौदलाच्या निर्णयामुळे या विमानतळाच्या उपयुक्ततेविषयी पुन्हा एकदा शंका व्यक्त करण्यात येत आहेत. दिवसाला १८० नागरी विमाने हाताळणारा हा विमानतळ नौदलाच्या ताब्यात आहे.या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे दाबोळी येथील विमानतळाची धावपट्टी खराब झाली असून तिच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे सांगून दोन नोव्हेंबरपासून दर शनिवारी सहा तास ती बंद ठेवण्याचा निर्णय नौदलाने घेतला आहे.गोव्याच्या पर्यटन उद्योगाने नौदलाच्या ताब्यातील या विमानतळाविषयी नेहमीच त्रागा व्यक्त केला आहे. नौदलाच्या ताब्यात तो असल्याने व गोव्यात असलेल्या आयएनएस हंसा तळावर वैमानिक प्रशिक्षण चालवत असल्याने दिवसातून तो बराच वेळ नागरी वाहतुकीसाठी बंद असतो. मध्यंतरी नौदलाकडून हा विमानतळ काढून घ्यावा म्हणून राजकीय पातळीवर बऱ्याच हालचाली चालू होत्या; परंतु मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री असतानाही त्या प्रश्नावर कोणतीही भूमिका सरकारने घेतली नाही.दुसºया बाजूला, गोव्याच्या सीमेवर महाराष्ट्राला खेटून मोपा येथे उभारत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. गोव्यातील दोन संघटना पर्यावरणीय प्रश्नासाठी सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत. पर्यावरण मंत्रालयाने कमी झाडे असल्याचे दर्शवून जी पर्यावरणीय मान्यता या विमानतळाला दिली, त्याला सर्वोच्च न्यायालयाने हरकत घेतली आहे.४५०० कोटींच्या या प्रकल्पाचे काम जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला आॅगस्ट २०१६ मध्ये मिळाले असून एप्रिल २०१७ मध्ये अधिकृतरीत्या त्या कामाला सुरुवात झाली आहे. या करारानुसार या कंपनीला ४० वर्षे तो विमानतळ चालवायला मिळणार आहे. विमानतळ चार टप्प्यांत उभारायचा असून पहिला टप्पा २०२० मध्ये पूर्ण व्हायचा होता. सध्या कामाला स्थगिती असल्याने प्रतिदिनी सरकारला ५० लाखांचे नुकसान सोसावे लागत असल्याचा सरकारचा दावा आहे. जीएमआरने या विमानतळाच्या बांधकामावर अजूनपर्यंत २३० कोटी खर्च केले असून राज्य सरकारने जमीन संपादनावर २४० कोटी खर्च केले आहेत. परंतु मोपा विमानतळ सुरू झाला तरी चालू दाबोळी विमानतळ बंद केला जाणार नाही, अशी भूमिका दक्षिण गोव्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या दबावातून सरकारने घेतली आहे.दाबोळी विमानतळ जरी नौदलाच्या ताब्यात असला तरी नागरी विमाने उतरविण्यास निर्बंध असू नयेत, अशी पर्यटन क्षेत्राची मागणी आहे. धावपट्टी बंद न करता विमाने उतरविण्यास का मिळू नये, असाही त्यांचा सवाल आहे. दुस-या बाजूला, सिंधुदुर्गात उभारण्यात आलेल्या विमानतळाविषयीही पर्यटक संस्थांच्या मनात भीती आहे. महाराष्ट्रातील या विमानतळावर यापूर्वीच विमाने उतरविण्याची चाचणी घेण्यात आली आहे व तो कधीही कार्यान्वित होऊ शकतो.

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ