- नारायण गावस
पणजी: वाढती महागाई, बेराेजगारी तसेच कामगारांची केली जाणारी सतावणूक या विरोधी देशभर २६ नोव्हेबर ते २९ नाेव्हेबर पासून निदर्शने सुरु असून त्याचा भाग म्हणून आयटकतर्फे आझाद मैदानावर धरणे धरण्यात आली. कामगारांची केली जाणारी सतावणूक बंद करा तसेच कामगार कायद्यात बदल करा अशी मागणी करण्यात आली.
केंद्र सरकार कामगार विरोधी कायदा लादून कामगारांची सतावणूक करत आहे. खासगी कंपन्यांचे व्यावस्थापन कामगारांची सतावणूक करते. पण सरकार या कामगारांचा विचार न करता खासगी कंपन्यांचे हीत जोपासत आहे. आज कंत्राटी पद्धत कामगारांवर लादू करुन कामगारांची सतावणूक सुर आहे. कामगारांना सुरक्षा पुरविली जात नाही. त्यांना पगार वाढ वेळेवर केली जात नाही. त्यांना त्यांचे हक्क दिले जात नाही. म्हणून देशभर या कामगार विरोधी धोरणामुळे सर्व कामगार संघटना धरणे धरत आहे.
देशभर सरकारी कार्यालये. विधानसभा अशा विविध भागात निदर्शने सुरु आहे. त्याचा भाग म्हणून गाेव्यात आम्ही आझाद मैदानावर हे धरणे केले आहे, असे यावेळी कामगार नेेते ॲड. राजू मंगेशकर यांनी सांगितले. कामगार आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. शेतकरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. तसेच इतर विविध संघटना आपल्या हक्कासाठी लढत आहे. पण त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही. सरकार त्यांच्या हितासाठी कायदे करत नाही. आज महागाई खूप वाढली आहे. पण कामगारांचा पगार तसाच आहे. त्यांना इतर कुठल्याच सुविधा या खासगी कंपन्यांकडून दिल्या जात नाही. त्यामुळे आज कामगारांना आपले हक्कासाठी लढावे लागत आहे असेही कामगार नेते राजू मंगेशकर म्हणाले.