नारायण गावस -
पणजी : राज्यात ७ मे राेजी लाेकसभेचे मतदान हाेणार असल्याने मुख्य निवडणूक कार्यालयाचा प्रचार जोरात सुरु आहे. मुख्य निवडणूक कार्यालयाचे अधिकारी निवडणूक आयकाॅन लाेकांमध्ये मतदानाविषयी जागृता केली जात आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक ठिकाणी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमही राबविले जात आहे. तसेच लाेकांचे मतदानाविषयी आकर्षण वाढावे यासाठी विविध ठिकाणी मतदान जागृता करण्याचे पोस्टर तसेच चित्रे काढली जात आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यात ठिकठिकाणी भिंतीवर ७ राेजी मतदान करण्याविषयी जनजागृती करणारी चित्रे काढली आहे. या चित्रांमार्फत मतदान करा असा संदेश दिला आहे. या ७ राेजी मतदान हाेणार असल्याने निवडणूक अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे हा या मागचा हेतू आहे.
९० टक्के मतदान लक्षयंदा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यात लोकसभेचे मतदान ९० टक्के व्हावे यासाठी प्रचार सुरु आहे. यासाठी विविध माध्यमातू्न प्रचार प्रसार केला जात आहे. अधिकारी सदस्य तसेच निवडणूक आयकॉन यासाठी प्रचार करत आहेत. राज्यात ज्या प्रकारे पंचायत तसेच विधानसभेसाठी मतदान होते तशाच प्रकारे यंदा लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काम केेले जात आहे. यासाठी नवमतदारांपासू्न ज्येष्ठ मतदारांना सर्वांना मतदानाविषयीचे महत्व पटवून दिले जात आहे. तसेच महाविद्यालयात तसेच इतर विविध ठिकाणी जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहे.