शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

गोव्यात सार्वजनिक प्रकल्पांसाठी

By admin | Published: March 17, 2015 1:38 AM

संरक्षण दलाच्या जागाही घेणार!गोव्यासह देशातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी अडथळा ठरणाऱ्या लष्कराच्या ताब्यातील जागा अशा

संरक्षण दलाच्या जागाही घेणार!गोव्यासह देशातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी अडथळा ठरणाऱ्या लष्कराच्या ताब्यातील जागा अशा अडथळ््यांपासून मुक्त केल्या जातील, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना दिली. या संदर्भातील प्रक्रिया संरक्षण खात्याने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. लष्कराच्या अशा जागा मुक्त करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली आहेत, असे ते म्हणाले. राजधानी पणजीत कला अकादमीजवळ लष्कराचे इस्पितळ आहे. येथे पार्किंग प्रकल्प उभारला जाईल आणि इस्पितळ अन्यत्र हलवले जाईल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, संरक्षण खात्यातील जागा परत घेणे ही साधी गोष्ट नाही; परंतु सार्वजनिक प्रकल्पांना अडथळा ठरणाऱ्या जागा परत घेऊन लष्कराला पर्यायी जागा दिली जाईल किंवा निधी दिला जाईल. या संदर्भातील परिपत्रक गोव्याच्या मुख्य सचिवांना लवकरच पाठविले जाईल. पार्किंग प्रकल्पाचा प्रस्ताव सरकारतर्फे पाठविण्यास पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांना सांगितलेले आहे. पर्रीकर म्हणाले, देशात लष्कर किंवा नौदलाचे स्थानिक नागरिकांशी जागेवरून मोठे वाद आहेत. अनावश्यक जागाही संरक्षण खात्याने ताब्यात घेतल्याने रस्त्यालाच अडथळे येतात अशा १०० तक्रारी गोव्यासह देशभरातून आलेल्या आहेत. त्यापैकी ३२ जागा अधिकाऱ्यांना आदेश देऊन मुक्त केलेल्या आहेत. उर्वरित जागांसंदर्भात आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी त्याचे पालन केलेले नाही, अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. संरक्षण खात्यात आपल्याला शून्यातून काम करावे लागले; कारण अधिकाऱ्यांत सेवा ज्येष्ठतेवरून अनेक तक्रारी आहेत, अशी माहिती पर्रीकर यांनी दिली. ते म्हणाले, गोव्यात हेलिकॉप्टर बांधणीचा उद्योग सुरू करण्यासाठी हिंदुस्थान एरोनॉटिकल कंपनीस शक्यतांसंदर्भात पडताळणी अहवाल देण्यास सांगितले आहे. तो प्राप्त झाल्यानंतर गोव्यात हा उद्योग साकारू शकेल का, याचे उत्तर मिळेल. नौदलात सेवेस गोमंतकीय येत नाहीत हा चुकीचा समज आहे, असे सांगून पर्रीकर म्हणाले, नौदलाच्या एकूण ४० हजार कर्मचाऱ्यांत मला दोनशे गोमंतकीय भेटले. फक्त लष्कराच्या सेवेतील गोमंतकीयांचे प्रमाण मात्र कमी आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणूक प्रचारार्थ गोव्यात फिरत असताना किमान पाच कुटुंबांनी संरक्षण दलात नोकरी करत असल्याची माहिती मला दिली.