शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

निरोगी राहण्याचा सल्ला देत नागपुरातील डॉक्टरांनी सायकलवरून केला पुणे-गोवा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 2:10 PM

म्हापसा- सायकल चालवा निरोगी व तंदुरुस्त राहा. तसेच आपला परिसर प्रदूषण मुक्त ठेऊन स्वच्छतेला हातभारा लावा, असा संदेश देत नागपुरातील पाच डॉक्टरांनी पुणे ते गोवा असा सहा दिवस सायकलवरुन दौरा केला. पाच दिवसात या डॉक्टरांनी सायकलीवरुन ५८६ किलोमीटर खडतर असा कोकण मार्गे प्रवास करुन हा संदेश लोकापर्यंत पोहोचवला.  दर दिवशी ...

म्हापसा- सायकल चालवा निरोगी व तंदुरुस्त राहा. तसेच आपला परिसर प्रदूषण मुक्त ठेऊन स्वच्छतेला हातभारा लावा, असा संदेश देत नागपुरातील पाच डॉक्टरांनी पुणे ते गोवा असा सहा दिवस सायकलवरुन दौरा केला. पाच दिवसात या डॉक्टरांनी सायकलीवरुन ५८६ किलोमीटर खडतर असा कोकण मार्गे प्रवास करुन हा संदेश लोकापर्यंत पोहोचवला.  

दर दिवशी साधारण १०० किलोमीटर प्रवास या डॉक्टरांनी केला. सर्वात जास्त प्रवास ११० किलोमीटरचा ठरला. तर सर्वात कमी प्रवास शेवटच्या दिवशी आज कुडाळवरुन गोव्यापर्यंतचा ६४ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या सहा दिवसाच्या दौऱ्यावरील थकवा आल्याचे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जाणवत नव्हते.  मूळ नागपुरात स्वतंत्र व्यवसाय करणाºया या डॉक्टरांनी आपला दौरा पुण्यातून सुरु केला. व्यवसायाने डॉक्टर असून सुद्धा आज धावपळीच्या जीवनात आपल्याला निरोगी राहण्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश देऊ शकतो तर समाजातील प्रत्येक घटकाला निरोगी राहण्यासाठी हे करणे सहज व सोपी गोष्ट असल्याचे मत सायकलवरुन गोवा दौरा केलेल्या डॉक्टरांनी व्यक्त केले. 

रविवारी पहाटे सुरु झालेल्या त्यांच्या या प्रवासाची सांगता शुक्रवारी सकाळी म्हापसा पालिकेच्या कार्यालया समोर झाली. त्यावेळी  म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष रोहन कवळेकर तसेच नगरसेवक तुषार टोपले, राजसिंग राणे, रायन ब्रागांझा, फ्रॅन्की कार्व्हालो यांनी पुष्पगुच्छ देऊन उस्फूर्त स्वागत केले. डॉक्टरांनी हाती घेतलेला हा उपक्रम स्तुतीस पात्र असल्याचे मत कवळेकर यांनी त्यांचे स्वागत करताना व्यक्त केले. 

पाच डॉक्टरांच्या या पथकात काही सर्जन तर काही फिजीशीयन्स आहेत. त्यात एक महिला तर चार पुरुष डॉक्टरांचा समावेश होता. यात डॉ. राजेश सिंघवी, डॉ. धनंजय बोकारे, डॉ. किरण बेलसरे, डॉ. अनुपमा बेलसरे, डॉ. शैलेश निसळ तसेच त्यांच्या पत्नी डॉ. रम्या निसळ यांचा त्यात समावेश होता. 

वाटेत सहायता करण्यासाठी गाडीची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली; पण सामान ठेवण्यापलिकडे तसेच गरजेच्या वस्तू घेण्यापलिकडे त्याचा फारसा उपयोग या डॉक्टरांना झाला नाही. प्रवासादरम्यान वाटेत वेगवेगळे अनुभव आले. विविध विचारसरणीतल्या लोकांशी त्यांची चर्चा झाली. असे असले तरी स्वच्छतेबद्दल लोकात निर्माण झालेली जागृती लक्ष वेधून घेण्यासारखी होती अशी माहिती डॉ. शैलेश निसळ यांनी दिली. प्रवासा दरम्यान पाहिलेली मंदिरे तसेच इतर अनेक स्थळे लोकांकडून स्वच्छ ठेवण्यात आल्याचे दिसून आले. रस्त्याच्या बाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ दिसून आला. त्यामुळे स्वच्छते संदर्भात लोकांत जागृती झाल्याचे पाहून समाधान वाटत असल्याचे ते म्हणाले. 

नागपुरातून हे डॉक्टर शुक्रवारी पुण्यात दाखल झाले. तेथे गोवा दौरा करण्यासाठी सायकली मिळवल्यानंतर पुण्यावरुन तामीळघाट त्यांनी गाठला व तेथून नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. तामीळघाटावरुन हे डॉक्टर रायगडला आले. सुरुवातीचा हा प्रवास बराच खडतर झाल्याची माहिती डॉ. शैलेश निसळ यांनी दिली. वाटेत अनेक ठिकाणी हातात सायकली घेऊन प्रवास करावा लागला. 

रायगड किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर तेथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या स्मृतीकडे पाहून मनाला समाधान वाटले तसेच सर्व शिण निघून गेल्याची माहिती डॉ. शैलेश निसळ यांनी दिला. सुरुवातीच्या खडतर प्रवासानंतर पुढील प्रवास चांगला झाल्याचे ते म्हणाले. रायगड वरुन दापोली असा १०० किलोमीटरचा प्रवास केला. दापोलीवरुन नंतर गणपतीपुळे असा प्रवास त्यांनी केला. गणपतीपुळेला गणपतीचे दर्शन घेऊन त्या रात्री तेथे वास्तव्य केल्यानंतर पुढील प्रवास किनारी भागातून सुरु झाला. गणपतीपुळेवरुन पडेल व पडेल येथून नंतर कुडाळ असा कोकणातील किनारी भागातून प्रवासाचा शेवटचा टप्पा पूर्ण केला. काल रात्री कुडाळला पोहचल्यानंतर आज सकाळी पहाटे ६.३० वाजता गोवा प्रवासाला सुरुवात केली व ६२ किलोमीटरचा हा शेवटचा टप्पा पाच तासात सकाळी ११.३० वाजता पूर्ण केला व त्यांनी उत्तर गोव्यातील म्हापसा शहर गाठले. 

प्रवासात किरकोळ त्रास वगळता मोठा त्रास जाणवला नसल्याची माहिती डॉ. रमा निसळ यांनी सांगितले. सायकल पंक्चर होण्याच्या घटना वाटेत घडल्या. तसेच पथकातील एका डॉक्टरला झालेला किरकोळ अपघात प्रवासात कोणताच त्रास जाणवला नसल्याचे डॉ. रमा निसळ म्हणाल्या. निसर्ग रम्य अशा गोव्यात दाखल झाल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटली. पुढील काही दिवस गोव्यात वास्तव्य करणार असल्याची माहिती यावेळी दिली.