पणजी - गोवा व्यवस्थापन संस्थेचे (जीम) अद्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या साखळी येथील निवासस्थानी पुणे पोलिसांनी झडती घेतली. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तेलतुंबडे हे जीममध्ये अध्यापक असून जीमच्या कॅम्पसमध्येच त्यांचे निवासस्थान होते. भीमा-कोरेगाव घटनेनंतर ह्या घराला कुलूपच होते. मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास पुणे पोलिसांची एक तुकडी या ठिकाणी दाखल झाली. त्यांनी सुरक्षारक्षकडून चावी घेऊन दरवाजाचे कुलूप खोलून घराची झडती घेतली.तेलतुंबडेच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी संगणक, लॅपटॉप, सीडी, पेपर आणि काही पुस्तके जप्त केल्याची माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात आली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात मंगळवारी देशात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. साखली येथील छापा हा त्याचाच भाग आहे. रांची येथे फादर स्टॅन स्वामी याच्या निवासस्थानी सकाळी ६ वाजता छापा टाकण्यात आला होता.
भीमा-कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई, गोव्यात आनंद तेलतुंबडेच्या निवासावर छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 6:38 PM