शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मुख्यमंत्री कार्यालयाने हाताळलेल्या ३ हजारांहून अधिक फाइल्सबद्दल प्रश्नचिन्ह 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 10:03 PM

पर्रीकर यांचा ‘नोट’ बेकायदा आणि घटनाबाह्य असल्याचा काँग्रेसचा आरोप

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्या २८ फेब्रुवारी रोजी सरकारी फाइल्सवर सह्या करण्याचे अधिकार प्रधान सचिव तसेच स्वत:च्या सचिवांना बहाल करणारा जो ‘नोट’ जारी केला, तो बेकायदा आणि घटनाबाह्य असून आतापर्यंत ३ हजारांहून अधिक फाइल्स बेकायदा हाताळल्या गेल्या आणि हे सर्व निर्णय बेकायदा आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे. या प्रश्नावर कोणी न्यायालयात गेल्यास काँग्रेस समर्थन देईल. आम्ही या प्रश्नावर जनतेच्या न्यायालयात जाऊ, असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.  चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत आरटीआयखाली प्राप्त केलेला २८ फेब्रुवारीचा मुख्यमंत्र्यांचा ‘नोट’ आणि त्यानंतर एका फाइलवर प्रधान सचिवांनी केलेली सही याच्या प्रती सादर केल्या. या ‘नोट’मध्ये मुख्यमंत्री म्हणतात की, ‘डॉक्टरांनी मला तूर्त प्रत्यक्ष फाइल्स हाताळण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे कारण त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सरकारी दस्तऐवजांवर किंवा फाइल्सवर माझा निर्णय, निर्देश नोंद करण्यासाठी प्रधान सचिव किंवा त्यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्र्यांच्या सचिवाला सह्या करण्याचे निर्देश देत आहे’. गिरीश चोडणकर म्हणाले की, घटनेच्या १६६ कलमाप्रमाणे सरकारला कामकाजाचे नियम घालून देण्यात आलेले आहेत. १९९१ च्या या नियमांची पर्रीकर यांनी पायमल्ली केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपले अधिकार अन्य व्यक्तीला देणारी कोणतीही अधिसूचना काढलेली नाही किंवा राजपत्रातही प्रकाशित केलेले नाहीत. त्यामुळे बेकायदेशीरपणे सरकारचा कारभार चालू आहे. ही घटनेचीही फसवणूक आहे.’ मुख्यमंत्र्यांकडे संमतीसाठी येणाऱ्या फाइल्स या धोरणात्मक निर्णयाच्या, कायदेविषयक बाबींच्या, खर्च मंजुरीच्या असतात. या फाइल्स प्रत्यक्ष हाताळल्याशिवाय निर्णय घेताच येणार नाही. ‘नोट’मध्ये मुख्यमंत्र्यांनी आपण फाइल्स हाताळू शकत नसल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. ‘घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होणार’फेब्रुवारीपासून आतापर्यंत जे निर्णय अशा महत्त्वाच्या फाइल्सना मंजुरी देऊन घेण्यात आले ते आव्हानास पात्र ठरतात. उद्या न्यायालयात कोणी आव्हान दिल्यास किंवा नवे सरकार स्थापन झाल्यास हे सर्व निर्णय रद्दबातल ठरविले जातील आणि मोठा घटनात्मक पेचप्रसंग राज्यात निर्माण होईल. अधिकाऱ्यांना तुरुंगात जावे लागेल. ही कृती गुन्हेगारी स्वरुपाची आहे, असा दावा गिरीश यांनी केला. फाइल्सवर सह्या करण्याचे अधिकार प्रधान सचिव किंवा सचिवाला देण्यास गोवा ही काही मुख्यमंत्र्यांची खाजगी मालमत्ता नव्हे, असे ते म्हणाले. सरकारी कामकाजाच्या नियमांप्रमाणेच मुख्यमंत्र्यांना वागावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.  

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा