अनेक वर्षापासून म्हापसा तसेच बार्देश वासियांची असलेली रविंद्र भवनाची मागणी आपल्या विद्यमान कारकिर्दीत पूर्ण केली जाणार असल्याची ग्वाही उपसभापती तसेच म्हापसातील आमदार जोशुआ डिसोझा यांनी दिली. आपल्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते.
आपल्या जाहीरनाम्यात भवनाची उभारणीसाठी आपण आश्वासन दिले होते. ते पूर्णत्वाकडे नेले जाणार आहे. कुचेली येथील प्रस्तावीक रविंद्र भवनात तेथील कोमुनीदादने कार्यालयासाठी जागेची मागणी केली आहे. सध्या या विषयावर चर्चा सुरु असून तत्वता त्यांना कार्यालयासाठी जागा देणे कसल्याच प्रकारची हरकत नसल्याचे ते म्हणाले.
म्हापसा हे राज्यातील अति महत्वाचे शहर असल्याने येथील पालिकेसाठी पूर्ण वेळ मुख्याधिकारी असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आपण सरकारी स्तरावर प्रयत्न करीत असून मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करणार असल्याची माहिती दिली. अतिरिक्त ताबा असल्याने अनेच अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक समस्यावर तातडीने उपाय योजना हाती घ्यावी लागत असल्याने चांगल्या अधिकाºयाची गरज असल्याची माहिती दिली.