राफेल व्यवहारात महाघोटाळा झालाय- प्रियंका चतुर्वेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:47 PM2018-08-27T22:47:08+5:302018-08-27T22:47:19+5:30

संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला राफेल विमान खरेदीचा व्यवहार हा देशाच्या सुरक्षेशी तडजोड करून करण्यात आलेला महाघोटाळा असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या संवाद निमंत्रक प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

RAFEL POLITICAL ATTACK: Priyanka Chaturvedi | राफेल व्यवहारात महाघोटाळा झालाय- प्रियंका चतुर्वेदी

राफेल व्यवहारात महाघोटाळा झालाय- प्रियंका चतुर्वेदी

Next

पणजी-  संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेला राफेल विमान खरेदीचा व्यवहार हा देशाच्या सुरक्षेशी तडजोड करून करण्यात आलेला महाघोटाळा असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या संवाद निमंत्रक प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. गरज नसताना राफाल विमानांची खरेदीची किंमत वाढवून घेण्याचे काम करण्यात आले आहे. शिवाय विमानांची संख्या कमी करून देशाच्या सुरक्षेशी तडजोड करण्यात आली आहे. 526 रुपये कोटींचे विमान 1670 रुपये कोटींना विकत घेऊन जनतेच्या पैशांचे 41,205 रुपये कोटी नुकसान करण्यात आले आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी कॉंग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

राफेल विमानांसाठी 12 डिसेंबर 2012 रोजी आंतरराष्ट्रीय निविदा यूपीए-काँग्रेस सरकारच्या कालावधीत 126 विमाने खरेदी करण्यासाठी जारी झाली. त्यावेळी प्रत्येक विमानासाठी 526.10 रुपये कोटी किंमत ठरली होती. यातील 18 विमाने फ्रान्समधून तयार करून येणार होती तर 108 विमाने तंत्रज्ञान हस्तांतरण प्रक्रियेद्वारे भारतात हिंदुस्तान एरोनोटिक्स या सार्वजनिक आस्थापनाद्वारे तयार केली जाणार होती. या निविदेप्रमाणे त्यावेळी 36 विमानांची किंमत रुपये 18,940 कोटी होणार होती. पण 10 एप्रिल 2015 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तातडीची गरज भासवून पेरिसमध्ये 7.5 अब्ज युरो किंमतीत (प्रत्येक विमानासाठी रुपये 1670.70 कोटी किंमत) 36 विमाने विकत घ्यायचा निर्णय घेतला. या 36 विमानांची भारतीय चलनांतील किंमत रुपये 60,145 कोटी एवढी होती. डेसोल्ट एव्हीएशनचा वार्षिक अहवाल 2016 व रिलायन्स डिफेन्स लिमिटेड कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकातून ते स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या 36 विमानांतले पहिले विमान सप्टेंबर 2019 मध्ये तर शेवटचे विमान 2022 मध्ये यायचे आहे. म्हणजेच एप्रिल 2015 मध्ये करार केल्यानंतर आठ वर्षाच्या कालावधीनंतर. तेही भारताला चीन व पाकिस्तानकडून सुरक्षेचा धोका असताना. देशाच्या सुरक्षेकडे केलेली ही तडजोड नव्हे का? आणि ह्यतांतडीने खरेदी प्रक्रिया तत्वाच्या विरोधी व्यवहार नव्हे का असा प्रश्नही त्यांनी केला आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी याचे स्पष्टीकरण देण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title: RAFEL POLITICAL ATTACK: Priyanka Chaturvedi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.