गोव्याला खास दर्जाच्या मागणीस राहुल गांधी अनुकूल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 08:40 PM2019-03-09T20:40:05+5:302019-03-09T20:40:41+5:30
गोव्याच्या जमिनी राखून ठेवणो आणि या प्रदेशाच्या अस्मितेचे संरक्षण करणो अशा हेतूने गोव्याला खास दर्जा द्यायला हवा, अशी मागणी गोंयचो आवाज आणि अन्य एनजीओ व सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी राहुल गांधी यांच्याकडे केली.
पणजी - गोव्याच्या जमिनी राखून ठेवणो आणि या प्रदेशाच्या अस्मितेचे संरक्षण करणो अशा हेतूने गोव्याला खास दर्जा द्यायला हवा, अशी मागणी गोंयचो आवाज आणि अन्य एनजीओ व सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी राहुल गांधी यांच्याकडे केली. गांधी यांनी या मागणीस अनुकूलता दर्शवली व कोळसा प्रदूषणासह अन्य गैरप्रकारांविरुद्ध लढणा:या कार्यकत्र्याचे कौतुकही केले.
गोव्यात शुक्रवारी सायंकाळी दाखल झालेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गांधी हे शनिवारी सकाळी गोव्यात होते. त्यांना खनिज खाण अवलंबित, गोव्याचे मच्छीमार व्यवसायिक, वास्कोतील कोळसा प्रदूषणाविरुद्ध लढणा:या एनजीओ आणि अन्य घटक व व्यवसायिक गांधी यांना भेटले. गोव्याच्या प्रादेशिक आराखडय़ाचा गैरफायदा घेत काही मंत्री गोव्याच्या जमिनी विकण्याची दारे खुले करत आहेत, मोठय़ा बिल्डरांच्या घशात जमिनी घातल्या जात आहेत अशा प्रकारची तक्रार सामाजिक कार्यकत्र्यानी केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व स्वाती केरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्याला आर्थिक पॅकेज नको तर गोव्याचे वेगळेपण व गोव्याची अस्मिता राखून ठेवण्यासाठी गोव्याला खास दर्जा हवा आहे. काँग्रेस सरकार केंद्रात अधिकारावर आल्यानंतर गोव्याला खास दर्जा द्यावा अशी विनंती सामाजिक कार्यकत्र्यानी केली. देशात केवळ जमिनी व अस्मिता राखून ठेवण्यासाठी अन्य कोणत्या राज्यांना खास दर्जा आहे हे गांधी यांनी जाणून घेतले. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर आदी उदाहरणो गोंयचो आवाज व अन्य एनजीओंनी दिली. गांधी यांनी या मागणीविषयी अनुकूलता दाखवल्याचे चोडणकर म्हणाले.
कार्यकर्त्यांचे कौतुक
कोळसा प्रदूषणाबाबतही गांधी यांनी चिंता व्यक्त केली. ग्रीन मालाची एमपीटीमधून वाहतूक व्हायला हवी, तसेच एमपीटीच्या कामगारांचीही काळजी घेत कोळसा प्रदूषणाद्वारे होणारे प्रदूषण बंद व्हायला हवे, असा मुद्दा सामाजिक कार्यकत्र्यानी मांडला. वास्कोतील कुटूंबांना कोणते परिणाम कोळसा प्रदूषणामुळे भोगावे लागतात हे गांधी यांनी जाणून घेतले. खनिज खाण अवलंबित जेव्हा गांधी यांना भेटले तेव्हा गोव्यात खनिज खाणी सुरू होण्यासाठी सगळे प्रयत्न करू असे गांधी यांनी सांगितल्याचे चोडणकर म्हणाले. गोव्याची स्थिती खरोखर वाईट आहे, सामाजिक कार्यकर्ते त्याविरुद्ध लढतात हे कौतुकास्पद आहे असे गांधी यांनी नमूद केल्याचे चोडणकर म्हणाले.