शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

राहुल गांधी पर्रीकरांना भेटले, तब्येतीची केली विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 1:52 PM

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी अचानक पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाला भेट दिली आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या केबिनमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांचे सध्याचे आरोग्य व तब्येत याविषयी विचारपूस केली.

पणजी : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी अचानक पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाला भेट दिली आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या केबिनमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांचे सध्याचे आरोग्य व तब्येत याविषयी विचारपूस केली. राहुल गांधी हे अशा प्रकारचे पर्रीकर यांच्या केबिनमध्ये प्रथमच पोहोचले. गोवा विधानसभेचे अधिवेशन मंगळवारी सकाळी सुरू झाले. राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणाने कामकाजाला आरंभ झाला.अभिभाषणानंतर दुपारी बारा वाजण्यापूर्वीच कामकाज थांबले. त्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर विधानसभा प्रकल्पातील स्वत:च्या केबिनमध्ये गेले. पंधरा मिनिटांनंतर राहुल गांधी यांचे कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये विधानसभा प्रकल्पाच्या ठिकाणी आगमन झाले. राहुल गांधी गेल्या शनिवारपासून गोव्यात आहेत. आपली आई सोनिया गांधी यांच्यासोबत गांधी गोव्यात खासगी भेटीवर आलेले आहेत. त्यांनी यापूर्वी कधीच गोव्याच्या विधानसभा प्रकल्पाला भेट दिली नव्हती. ते येथे येऊन पर्रीकर यांच्या तब्येतीविषयी विचारपूस करतील याची कल्पना अगोदर जास्त कुणालाच नव्हती. गांधी यांचे आगमन होण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर चर्चा पसरली. विधानसभा प्रकल्पाच्या मुख्य दाराकडे सगळे थांबले होते, पण राहुल गांधी हे विधानसभा प्रकल्पाच्या मागील दाराने आत आले. उपसभापती मायकल लोबो यांनी गांधी यांचे स्वागत केले.आत येताना व बाहेर जाताना राहुल गांधी प्रसार माध्यमांशी काही बोलले नाही. त्यांनी फक्त हास्य केले. विधानसभा प्ररल्पात पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री पर्रीकर यांचे केबिन आहे. केबिनमध्ये जाऊन गांधी यांनी पाच मिनिटे पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. पर्रीकर अतिशय थकलेले असून त्यांना दोन व्यक्तींच्या हाताला धरूनच सभागृहात प्रवेश करावा लागतो हे सर्व आमदारांनी मंगळवारी पाहिले. तुम्ही आजारी असतानाही कसे कायम काम करता असे राहुल गांधी यांनी विचारले. त्यावर आपला स्वभावच तसा आहे व त्यानुसार आपण काम करतो, असे पर्रीकर यांनी सांगितल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली व काँग्रेसच्या आमदारांनाही भेटावे, अशी विनंती केली. त्यानुसार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाच्या लॉबीमध्ये सर्व काँग्रेस आमदारांची भेट घेतली. राजकीय भेटीसाठी आपण येत्या महिन्यात गोव्यात येईन, असे गांधी यांनी सांगितले व ते दक्षिण गोव्यातील हॉटेलमध्ये परतले. तिथेच त्यांचा तूर्त निवास आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी