शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

कॅसिनोविरोधात सोमवारी रायबंदर बंद

By admin | Published: July 21, 2016 2:19 AM

पणजी : रायबंदर येथे चोडणच्या दिशेने नांगरून ठेवालेले फ्लॉटेल तेथून हटवण्यास सरकारला अपयश आल्याने सोमवार,

पणजी : रायबंदर येथे चोडणच्या दिशेने नांगरून ठेवालेले फ्लॉटेल तेथून हटवण्यास सरकारला अपयश आल्याने सोमवार, २५ जुलै रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी रायबंदरवासीयांनी रायबंदर बंदची हाक दिली आहे. सरकारने हे फ्लॉटेल न हटवल्यास प्रसंगी आंदोलन राज्यपातळीवर नेले जाईल, असा इशारा अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी बुधवारी रायबंदर येथे पत्रकार परिषदेत दिला. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, नगरसेवक रूपेश हळर्णकर व रायबंदरचे नागरिक या वेळी उपस्थित होते. कॅसिनोच्या प्रश्नावर लवकरच राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी करण्यात येणार आहे. यासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे अ‍ॅड. रॉड्रिग्स यांनी सांगितले. फ्लॉटेलविरोधात रायबंदरवासीयांनी ७ जुलै रोजी जाहीर सभा घेतली होती. यात हे फ्लॉटेल हटविण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, मुदत संपत आली तरी काहीच हालचाली न केल्याने शांततापूर्ण पध्दतीने रायबंदर बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाला काही सत्ताधारी आमदारांबरोबर इतर काही आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. आमदारांनी विधानसभेत कॅसिनोप्रश्नी लक्षवेधी सूचना मांडण्याबरोबरच खासगी विधेयक देखील मांडावे, अशी मागणी रॉड्रिग्स यांनी केली.