पणजी : मुसळधार पावसामुळे राज्यात ठीक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या तर घरांमध्ये पाणी शिरुन पडझड झाली. शाळेत गेलेेले विद्यार्थी अडकून पडल्याने शिक्षण संचालकांनी पालकांनी शाळेत येऊन मुलांना सुरक्षित घरी नेण्याचे आवाहन केले. राज्य हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला आहे.
डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूर आला. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला त्यामुळे गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने काही भागात गावांकडील संपर्क तुटला आहे.राज्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला गुरुवारी सकाळी राज्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी गाड्या अडकून पडल्या तर घरांमध्ये पुराचे पाणी शिरुन पडझड झाली. शाळेत गेलेेले विद्यार्थी अडकून पडल्याने शिक्षण संचालकांनी पालकांनी शाळेत येऊन मुलांना सुरक्षित घरी नेण्याचे आवाहन केले. राज्य हवामान खात्याने आज रेड अलर्ट जारी केला. तसेच मुसळधार पावसाने निर्माण हाेणाऱ्या आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी ०८३२ -२४१९५५० / ०८३२ -२२२५३८३ / ०८३२ -२७९४१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.बुधवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सर्व राज्याला फटका बसला आहे. नानोडा डिचाेली येथे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेली कदंब बस पाण्यात अडकून बंद पडली. डिचाेलीत नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बाजार परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. वाळवंटी नदीला पूर आल्याने केरीतील पूल पाण्याखाली गेला. तसेच म्हादईची पातळी वाढल्याने गांजे उसगाव रस्ता पाण्याखाली गेला. दूधसागर नदीची पातळी वाढल्याने निरंकाल तसेच अन्य गावात पाणी भरले. तसेच सावर्शे सत्तरीत नदीचे पाणी वाढल्याने वाळपई फोंडा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होतो.तसेच पेडणे परिसरात कळणे नदीला पूर आल्याने चांदेलमधील रस्ता पाण्याखाली गेला कासारवर्णेत पुरस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच साळ येथील भुमिका मंदिर परिसरात पाणी साचल्याने. नागधर पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर जाेडणारा रस्ता पाण्याखाली गेला. मोपातील कडशी नदीला पूर आल्याने दोन पुल पाण्याखाली गेले यामुळे गावांचा संपर्क तुटला. तिळारीचा धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. तिळारी नदी धोक्याची पातळी ओलांडणार असल्याने सतर्क राहण्याचा इशारा दिला. तसेच राजधानी पणजीत पावसाने अनेक रस्ते पाण्याखाली गेले.२४ तासांत ५.३३ इंच पाऊसराज्यात गेल्या २४ तासांत ५.३३ इंच पाऊस झाला यात केपेमध्ये सर्वाधिक जास्त ७.८७ इंच पाऊस झाला आहे. आतापर्यत वाळपईत सर्वात जास्त म्हणजे १५१.५१ इंच पाऊस झाला आहे. राज्यात १ जून ते १ ऑगस्ट या दोन महिन्यात आतापर्यंत १२१.७ इंच पाऊस झाला आहे.