पणजी : गोव्यात नैऋत्य मान्सून ४ जून पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला तरी २० मे पर्यंत गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नैऋत्य मान्सूनची प्रतीक्षा करीत असतानाही गोमंतकीयांना पावसाच्या सरी अनुभवायला मिळणार आहेत. १८, १९ आणि २० मे पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दोन दिवस अगोदरच अंदमानमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने गती घेतल्यामुळे १ जून ऐवजी ३० पर्यंत तो केरळच्या किनारपट्टीवर येऊन थडकणार असल्याची चिन्हे आहेत. सध्या गोव्यात सुरू असलेला पाऊस हा भारतीय महासागरात सक्रिय झालेल्या मान्सूनचा परिणाम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. रविवारी रात्रीही मान्सूनपूर्व पावसाच्या सरीं कोसळल्या. विजेचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला.(प्रतिनिधी)
गडगडाटासह राज्यात पाऊस
By admin | Published: May 18, 2015 1:55 AM