पणजी : गोव्यात प्रचंड पाऊस पडत असून जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. खराब हवामान व जोरदार पावसाचा परिणाम म्हणून गोव्याला येणारी सोळा विमाने दाबोळी विमानतळाकडून अन्यत्र वळविण्यात आली आहेत. शेकडो प्रवाशांना यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले.
मंगळवारी रात्रीपासून गोव्यात प्रचंड वृष्टी सुरू आहे. बुधवारी तर अखंडीतपणो वृष्टी सुरू राहिल्याने गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले. प्रचंड पावसामुळे लोकांना घराबाहेर पडणो मुश्कील झाले आहे. काही भागांत गुडघाभर पाणी साचले आहे. विविध खासगी आस्थापने व अन्यत्र नोकरी, धंद्यासाठी येणा:या वाहनधारकांनी पावसात जागा मिळेल तिथे वाहने पार्क केल्याने वाहतुकीचा फज्जा उडाल्याचेही चित्र प्रमुख शहरांमध्ये दिसून आले. पणजीसह काही भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. मान्सून सुरू झाल्यानंतर गोव्यात अलिकडे असा पाऊस पडला नव्हता. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी कडा कोसळल्या.
देश-विदेशातून दाबोळी विमानतळावर विमाने येतात. अतिवृष्टीमुळे सोळा विमाने देशातील अन्य विमानतळांवर वळविण्यात आली. गोव्याहून विमानाने अन्यत्र जाऊ पाहणारे प्रवासी दाबोळी विमानतळावर अडकून उरले. दाबोळी विमानतळाचे संचालक बी.सी एच नेगी यांना याविषयी विचारले असता, त्यांनी एकदा हवामान सुधारल्यानंतर सोळा विमाने गोव्याच्या विमानतळावर येण्यास मान्यता दिली जाईल. तूर्त विमाने अन्यत्र वळविण्याशिवाय पर्याय नाही.
दरम्यान, हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. गुरुवारीही गोव्यात जोरदार पाऊस राहिल, असे हवामान खात्याचे म्हणणो आहे. यामुळे पर्यटकांनी किंवा मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा जीवरक्षकांच्या संस्थेनेही दिला आहे.