समीर नाईक, पणजी: राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून पुढील २ तासांनी डिचोलीच्या सीमावर्ती भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि वार्यासह गडगडाट होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात कोरडे हवामान असल्याची माहिती विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पणजी गुरुवार १६ रोजी येथे सर्वाधिक ३५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तरे दाबोळी येथे २६.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
पुढील दोन दिवस १७ आणि १८ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ३०-४० किमी ताशी वेगाने वाहणारे वारे वेगळ्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. तर १९ आणि २० रोजी हवामानाचा कोणताही इशारा अद्याप तरी देण्यात आला नाही.