समीर नाईक, पणजी: राज्यात २५ ऑक्टोंबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे, या अनुषंगाने शुक्रवारी मशाल लाँचचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दोनापावला येथील राज भवन येथून मशाल रॅली सुरू करण्यात आली. शनिवारी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या मशाल रॅलीला सुरुवात केली.
यावेळी क्रीडा सचिव स्वेतीका सच्चन, क्रीडा खात्याच्या संचालक डॉ. गीता नागवेकर, गोव्याची स्टार सेलर का कुएल्हो, बॅडमिंटनपटू अनुरा प्रभुदेसाई, व इतर देशाचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू उपस्थित होते. दोनापावला येथील राज भवन येथून मशाल रॅलीला सुरुवात झाली, नंतर मशाल दोनापवला सर्कल हून करांझळे मार्गे मिरमार सर्कल, ते युथ हॉस्टेल ते कला अकादमी ते सांतइनेझ सर्कल, ते १८ जून मार्ग ते पणजी चर्च स्क्वेअर, ते मेरी इम्मॅक्युलेट ते फोर पिलार सर्कल, ते सांताक्रुझ मैदान, ते साग अथलेटिक्स मैदान बांबोळी असा या मशालचा जवळपास ८ कि.मी चा प्रवास राहिला.
उपस्थित खेळाडूंना या मशालचा मान मिळाला. या संपूर्ण प्रवासात राष्ट्रिय क्रीडा स्पर्धेचा बोधचिन्ह असलेला मोगा हा देखील त्यांच्यासोबत होता. गणेश चतुर्थी नंतर स्पर्धा असलेल्या सर्व ठिकाणावर मशाल पोहचणार आहे. राज्याबाहेर देखील ही मशाल पोहचणार आहे.