पणजी: वेर्णा येथील ड्युरालाईन कंपनीने कामावरुन काढून टाकलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत घेतले नाही, तर वेळ पडल्यास कायदा हातात घेऊ, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिला.
सेवेत पुन्हा घ्यावे या मागणीसाठी पणजी येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणाऱ्या या कामगारांची सरदेसाई यांनी बुधवारी भेट घेतली. कंपनीचे कामगार मागील आठ दिवसांपासून पणजीत आयटकच्या बॅनरखाली आंदोलन करीत आहेत.यावेळी आयटक नेता ख्रिस्तोफर फोन्सेका, ॲड. प्रसन्न उटगी उपस्थित होते.
सरदेसाई म्हणाले, की वेर्णा येथील ड्युराईन कंपनीच्या ज्या कामगारांना कामावरुन काढून टाकून टाकले, ते सर्व गोमंतकीय आहे. गोमंतकीय कामगारांवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही. सर्व कामगारांनी या कंपनीत २६ वर्ष काम केले आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे कामाहून अचानक काढणे हे अन्यायकारक आहे. सदर विषयी आपण कामगार खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.