शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

ख्रिस्ती मतदारांपर्यंत जा, त्यांचा विश्वास संपादन करा! गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, मंत्र्यांना बजावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 8:44 AM

कोणत्याही परिस्थितीत दक्षिणची जागा मिळवायचीच असा चंग भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने बांधला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात या वेळी कोणत्याही परिस्थितीत भाजप उमेदवारच विजयी व्हायला हवा अल्पसंख्याकांची काँग्रेसची एक गठ्ठा त्यासाठी मते भाजपकडे वळवा. ख्रिस्ती मतदारांकडे जा. त्यांचा विश्वास संपादन करा, असे गोवा भेटीवर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाच्या आमदार, मंत्र्यांना स्पष्टपणे बजावले आहे.

एकही ख्रिस्ती मतदार हातून सुटता कामा नये. प्रत्येकाकडे जा, त्यांचा विश्वास संपादन करा. यावेळी दक्षिण गोव्यातील जागाही आम्हाला जिंकायची आहे, असे शाह डिसेंबरमध्ये मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते तेव्हा त्यांनी सर्व भाजपच्या सर्व आमदार मंत्र्यांना असाच कानमंत्र दिला होता. आता शाह यांनी आमदारांना बजावले आहे. एकही ख्रिस्ती मतदार हातून सुटता कामा नये. प्रत्येकाकडे जा, त्यांचा विश्वास संपादन करा. यावेळी दक्षिण गोव्यातील जागाही आम्हाला जिंकायची आहे, असे शाह यांनी सांगितले आहे.

अल्पसंख्याकांना चुचकारण्याचे भाजपचे धोरण आता आणखी गती घेणार आहे. मोदीजींनी कानमंत्र दिल्यानंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आर्चबिशपना भेटले. मोदीजींचे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही चर्च संस्थेकडे चांगले संबंध ठेवले आहेत. चर्चच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याची जागा अवघ्या काही मतांनी भाजपला गमवावी लागली होती. सासष्टी तालुका हा ख्रिस्तीबहुल आहे. काँग्रेसकडे असलेली ही एक गठ्ठा मते यावेळी भाजपकडे वळलीच पाहिजेत, असा चंग शाह यांनी बांधला आहे. या दृष्टीने कामाला लागा, अशा सक्त सूचनाच त्यांनी केल्या आहेत.

भाजप देणार ख्रिस्ती उमेदवार ?

कोणत्याही परिस्थितीत दक्षिणची जागा मिळवायचीच असा चंग भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने बांधला आहे. तशा सूचना राज्यातील मंत्री, आमदारांनाही केल्या आहेत. दक्षिण मतदारसंघाचा विचार करता भाजप यावेळी दक्षिणेत एखाद्या ख्रिस्ती उमेदवाराचाही विचार करु शकतो. अशी चर्चा आहे की, चर्चिल आलेमांव किंवा दक्षिणेतील अन्य एखाद्या ख्रिस्ती नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. चर्चिल भाजपच्या संपर्काति आहेत.

समीकरणे बदलणार

- दुसरीकडे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी लुडमिन फालेरो काँग्रेसमध्ये होते.

- फ्रान्सिस सार्दिन यांचाही त्यावेळी प्रभाव होता. आता लुइझिन कॉंग्रेसमध्ये नाहीत. तसेच सार्दिन यांचाही प्रभाव उतरलेला आहे.

- काँग्रेस यावेळी सार्दिन यांना तिकीट देतील की नाही याबाबत साशंकता आहे.

- आणखी एक बाब म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीकडे काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावर युती असल्याने राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार चर्चिल आलेमाव यांचाही कॉंग्रेसला फायदा झाला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाAmit Shahअमित शाह