पणजी : २०२१चा प्रादेशिक विकास आराखडा अधिसूचित करण्याची प्रक्रिया येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल. काणकोण व पेडणे तालुक्यांचे आराखडे सर्वप्रथम अधिसूचित केले जातील. सासष्टी तालुक्यातून सर्वाधिक तक्रारी असल्याने या तालुक्याचा आराखडा सर्वांत शेवटी अधिसूचित होईल, असे नगरनियोजन खात्याचे मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सोमवारी विधानसभेत जाहीर केले. नगरनियोजन खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तरादाखल ते बोलत होते. राज्यभरातून ३५००हून अधिक हरकती व सूचना आलेल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी सभागृहात दिली. प्रादेशिक आराखडा लवकरात लवकर द्या, (पान २ वर)
प्रादेशिक आराखडा ३१ डिसेंबरपर्यंत
By admin | Published: August 11, 2015 1:38 AM