पणजी : राज्यातील पालिका क्षेत्रांमधील तथा शहरांमधील महामार्गांच्या बाजूने असलेल्या मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया अबकारी खात्याने सुरू केली आहे. सुमारे ७00 मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.ग्रामपंचायत क्षेत्रांमधील मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण अजून झालेले नाही. पंचायत क्षेत्रांमध्ये 'अॅप्रोचेबल रोड' पद्धतीने अबकारी खाते नव्याने सर्वेक्षण करणार आहे. त्यासाठी खात्याने अधिकाºयांचे पथक स्थापन केले आहे. शहरांमधील मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे काम पूर्णपणे संपुष्टात आल्यानंतर मग सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. पंचायत क्षेत्रांमधील रस्त्यांच्या बाजूचे अंतर नव्याने मोजले जाणार आहे. सध्या सर्व तालुक्यांमधील अबकारी खात्याच्या कार्यालयांकडून शहरांमधील मद्यालये व दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जात आहे.
गोव्यात ७00 मद्यालयांच्या परवान्यांचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 7:59 PM