पणजी : स्टॅम्प ड्युटी भरलेल्या २८ पैकी २० खाणींचेच लिज नूतनीकरण होणार, असे संकेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. न्यायमूर्ती शहा आयोगाने ठपका ठेवलेल्या ३७ खाणींचे लिज नूतनीकरण केले जाणार नाही. तसेच ज्या खाण कंपन्या चौकशीच्या बाबतीत सहकार्य करीत नाहीत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. १३ लिजांच्या नूतनीकरणासाठी सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असून परगावी असलेले खाण संचालक गोव्यात परतताच यासंबंधीचा आदेश काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. खाणमालक राधा तिंबलो यांचा स्वीस बँकेत काळा पैसा असल्याचे उघड झाले आहे. खाण घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलिसांचे विशेष पथक याची दखल घेऊन पावले उचलणार काय, असे विचारले असता पर्रीकर म्हणाले की, काळ्या पैशाबाबतचा विषय केंद्राच्या अखत्यारित आहे. खाण घोटाळाप्रकरणी गोवा पोलिसांचे विशेष तपास पथक केवळ खाण व्यवसायातील बेकायदा व्यवहारांची चौकशी करीत आहे. संचालकांच्या बोगस ना हरकत दाखल्याने खनिज निर्यात केल्याप्रकरणी दोन ट्रेडर्सवर कारवाई झालेली आहे. याशिवाय १७ चार्टर्ड अकाउंटंट खनिज उत्खनन आणि निर्यात या बाबतीत झालेला गोलमाल आणि बेकायदेशीरपणा याची चौकशी करीत आहेत. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर ज्यांनी लूट केली, ती वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलू. काही खाण कंपन्या चौकशीला सहकार्य करीत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करू. (पान २ वर)
त्या २0 लिजांचेच नूतनीकरण : पर्रीकर
By admin | Published: October 29, 2014 1:07 AM