शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

‘निवडणूक आयोगाच्या नोटिसीला आज उत्तर देणार’

By admin | Published: February 03, 2017 1:39 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाने माझ्याविरुद्ध नोटीस बजाविताना चुकीची प्रक्रिया स्वीकारली आहे. तथापि, शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत मी त्या नोटिसीला उत्तर देईन, असे

पणजी : केंद्रीय निवडणूक आयोगाने माझ्याविरुद्ध नोटीस बजाविताना चुकीची प्रक्रिया स्वीकारली आहे. तथापि, शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत मी त्या नोटिसीला उत्तर देईन, असे संरक्षणमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. निवडणूक प्रचारसभेत पैसे वाटपासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.‘माझ्याविरुद्धची नोटीस निवडणूक आयोगाने आधी आयोगाच्या संकेतस्थळावर टाकली. ज्याला नोटीस पाठवायची असते, त्याच्याकडे ती पोहचण्यापूर्वीच संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे चुकीचे आहे. दिल्लीहून पत्रकारांचे फोन येऊ लागले, तेव्हा मला या नोटीसबद्दल कळले. त्यामुळे मी फोन करून त्याविषयी आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारले. शेवटी बुधवारी रात्री मला पणजीतील एका सभेत नोटीसचा लिफाफा आणून देण्यात आला, असे पर्रिकर यांनी सांगितले. पर्र्वरी मतदारसंघातील एक निवडणूक अधिकारी पक्ष:पाती असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला व आक्षेपार्ह नोटिसा पाठविण्याऐवजी अशा अधिकाऱ्यांविरुद्ध आयोगाने आधी कारवाई करायला हवी, असेही ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)