बार्देस : धी म्हापसा अर्बन बँक आॅफ गोवाच्या मुख्य कार्यालयात शनिवार, दि. २५ जुलैपासून रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने पैशांची देवाण-घेवाण करण्यास निर्बंध खातल्याने भागधारक व ग्राहकांत खळबळ उडाली. बँकेतून दरदिवशी केवळ एक हजार रुपयेच काढता येतील, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बँकेच्या आडून सरकार बहुजन समाजाच्या हाती असलेल्या बँकेची प्रतिमा मलिन करण्याचे काम करीत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सहकारी संस्था कायदा १९४९च्या कलम क्र. ३५ व बँकिंग रेग्युलेशन अॅक्टच्या उपकलम/३५ ए नुसार रिझर्व्ह बँकेने तडकाफडकी नोटीस पाठवून २४ जुलैपासून बँकेने कर्ज देणे, अॅडव्हान्सेस देणे, खर्च करणे, देणेकऱ्यांचे पैसे फेडणे इत्यादीसंबंधी बंदी घातली आहे. शिवाय एखादी जागा खरेदी करणे किंवा विकण्यासही बंदी घातली आहे. बँकेच्या कामगार व अधिकाऱ्यांचा पगार देणे, (पान ४ वर)
म्हापसा अर्बनवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
By admin | Published: July 26, 2015 2:39 AM