शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

आमदार सावळांकडून मराठी राजभाषेसाठी ठराव

By admin | Published: July 19, 2016 7:31 PM

मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात ठराव मांडण्याचे ठरविले आहे. ठरावाची प्रत त्यांनी काल

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 19 -  मराठीला राजभाषेचे स्थान मिळावे म्हणून डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात ठराव मांडण्याचे ठरविले आहे. ठरावाची प्रत त्यांनी काल मंगळवारी सरकारच्या विधिमंडळ खात्यास सादर केली.सावळ यांनी यापूर्वी मराठी राजभाषेबाबतचे खासगी विधेयक विधिमंडळ खात्यास सादर केले होते. खात्याने त्यावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी हे विधेयक अगोदर कायदा खात्याकडे पाठवले. तिथून अजुनही त्या विधेयकाची सुटका झालेली नाही. विधेयकाची प्रत कायदा खात्याकडेच आहे. यामुळे सावळ यांनी यावेळच्या अधिवेशनात ठराव मांडावा असा निर्णय घेतला व त्याविषयीची नोटीस मंगळवारी दिली. आपला ठराव कसा असेल ते सावळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांनी ठरावाची प्रतच विधिमंडळ खात्याला सादर केली आहे.विधानसभा अधिवेशन येत्या 25 रोजी सुरू होत आहे. अधिवेशन तीन दिवस चालेल. शुक्रवार हा खासगी कामकाजाचा दिवस असतो. त्यावेळी आपल्याला ठराव मांडण्यास मिळावा, अशी सावळ यांची विनंती आहे. मराठी राजभाषेच्या चळवळीत सावळ यांनी यापूर्वी भाग घेतलेला आहे. मात्र त्यांनी मराठीसाठी ठराव आणल्यामुळे आता यापुढे त्यांचे सहकारी आमदार रोहन खंवटे व विजय सरदेसाई कोणती भूमिका घेतात याकडे मराठीप्रेमींचे लक्ष आहे. (खास प्रतिनिधी)