पणजी: दुहेरी नागरिकत्व तसेच ओसीआय कार्ड विषयावर सरकारने तोडगा काढावा. या विषयांकडे राजकारण म्हणून न पाहता गोमंतकीयांचा प्रश्न म्हणून पाहावे, असे मत कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेता सलमान खुर्शीद यांनी पणजीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दुहेरी नागरिकत्व बहाल करण्याचे धाेरण देशात नाही. मात्र गोव्याच्या बाबतीत दुहेरी नागरिकत्व तसेच ओसीआय कार्डचा विषय वारंवार चर्चेत येत आहे. यामुळे विदेशात नोकरी निमित स्थायिक असलेल्या गोमंतकीयांमध्ये या विषयावरुन चिंता व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने त्यावर तोडगा काढावा त्यांनी नमूद केले.
खुर्शीद म्हणाले, की दुहेरी नागरिकत्व व ओसीआय कार्ड या विषयांचे राजकारण करण्याएवजी गोमंतकीयांची सेवा म्हणून सर्व परिस्थितीचा अभ्यास करुन पर्याय शोधावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे सर्व विषय केंद्र सरकार समोर मांडून ठोस तोडगा काढावा. राजकीय आरक्षणाची मागणी गोव्यातील एसटी बांधव करीत आहेत. त्यांना त्यांचा अधिकार द्यावा. त्यांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वकपणे लक्ष द्यावे असेही त्यांनी नमूद केले.