लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : शिरोडा मतदारसंघ भाजप मंडळाच्या संपर्क से समर्थन कार्यक्रमांतर्गत भाजप मंडळ अध्यक्ष सुरज नाईक, सचिव अवधूत नाईक व मंत्री सुभाष शिरोडकर यांनी अभियानांतर्गत विविध ठिकाणी भेट देत नऊ वर्षांचे प्रगती पुस्तक प्रदान केले. यावेळी 'टिफीन पे चर्चा' कार्यक्रम श्री ब्रह्म दुर्गा सभामंडप, पाज येथे पार पडला.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, शिरोडा सरपंच पल्लवी शिरोडकर, मनुराय नाईक, पंज क्रिस्तेव डिकॉस्ता, लिबी फर्नांडिस, मधु खांडेपारकर, आनंद खांडेपारकर, माजी सरपंच अमित शिरोडकर, प्रसाद प्रभूगावकर, प्रकाश नाईक, ४५ बुथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, मोर्चा समिती व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख नेत्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी विविध सुविधा व सुरू असलेल्या विकास योजना व कामांची माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष सुरज नाईक यांनी केले तर कार्यक्रमाचा आढावा घेऊन सचिव अवधूत नाईक यांनी आभार मानले.
शिरोडा येथील 'टिफीन पे चर्चा' कार्यक्रमात सहभागी मंत्री सुभाष शिरोडकर, अध्यक्ष सुरज नाईक, सचिव अवधूत नाईक, पंच क्रिस्तेव डिकॉस्ता, पंच मधु खांडेपारकर, शिरोडा सरपंच पल्लवी शिरोडकर, माजी सरपंच अमित शिरोडकर, आनंद खांडेपारकर.