शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोल्हापूरच्या फाईन आर्टसच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीला फिल्म बाजारमध्ये प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 13:06 IST

पणजी : फाईन आर्टसची पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापुरातील लघुपटकर्त्या तरुण मंडळींचा प्रवास आता पूर्ण लांबीच्या कथापटांकडे सुरू झालेला आहे.

संदीप आडनाईकपणजी : फाईन आर्टसची पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापुरातील लघुपटकर्त्या तरुण मंडळींचा प्रवास आता पूर्ण लांबीच्या कथापटांकडे सुरू झालेला आहे. या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला इमेगो हा चित्रपट गोव्यामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)चा भाग असलेल्या एनएफडीसी संचलित फिल्म बझारमध्ये दाखविण्यात आला. या चित्रपटाचे जगभरातील प्रतिनिधींनी कौतुक केले.भारत, नेपाल व बांगलादेश येथून आलेल्या २०३ चित्रपटातून निवडण्यात आलेले २४ वेगवेगळ्या भाषेतील चित्रपट फिल्म बाजारच्या व्हूइंग रूममध्ये दाखविण्यात आले. यातील सहा चित्रपटांना नावाजण्यात आले. त्यात इमेगोचा समावेश आहे. फिल्म बाजारमधील या चित्रपटाच्या प्रदर्शनप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक करण चव्हाण, विक्रम पाटील (पटकथा-दिग्दर्शन) आणि विकास डिगे (कार्यकारी निर्माता) हे उपस्थित होते. त्यांना येथे देश-विदेशातील चित्रपट प्रतिनिधींशी थेट संपर्क साधता आला. इमेगो चित्रपट आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दौºयासाठी सज्ज आहे.दळवीज आर्टसचे करण चव्हाण, विक्रम पाटील, कलामंदिर महाविद्यालयाचे रावसाहेब चिखलवाळे, कलानिकेतन महाविद्यालयाचे विकास डिगे रहेजा, मुंबईचे विजय कुंभार अशी या चित्रपटाची कोअरटीम आहे. त्यांनी एकत्रितपणे या पूर्वी दगडफूल, पोल्युट, म्युट,अलोन अशा प्रत्ययकारी श्यभाषा असणाºया पुरस्कार विजेत्या लघुपटांची निर्मिती केलेली आहे.आंतरिक सुंदरतेची जाणीव असे आशयसूत्र असणाºया इमेगो या चित्रपटामध्ये व्हिटिलिगो (श्वेत्र) असणाºया युवतीची मानसिक स्थित्यंतरे दर्शवली आहेत.नववास्तववादी शैलीत घडणाºया या चित्रपटामध्ये लाईफ अ‍ॅज इट इज अश्ी भूमिका घेतलेला आहे.त्यानुसार अभिनय शैली, दृश्यभाषा केली आहे. या कलात्मक चित्रपटाची निर्मिती अविराज फिल्मस एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेने केली आहे. पोस्ट प्रोडक्शन निर्मिती कोल्हापुरातील पारस ओसवाल यांनी केली आहे. प्रोडक्शन डिझाईन रावसाहेब चिखलवाळे तर कार्यकारी निमार्ता विकास डीगे हे आहेत.चित्रपट समीक्षक डॉ.अनमोल कोठाडिया यांचे ह्या टीमला मार्गदर्शन लाभले आहे.या चित्रपटामध्ये ऐश्वर्या घायदार(कोल्हापूर), अमोल देशमुख (मुंबई) यांनी मुख्य भूमिका केली आहे. आदर्श कुरणे (कोल्हापूर) या बालकलाकाराने केलेल्या कामाचे विशेष कौतुक होत आहे. या चित्रपटाकरिता फिल्म अंड टेलीव्हीजन आॅफ इंडियाचे राकेश भिलारे (सहायक छायाचित्रण),राज जाधव(ध्वनी), दर्पण चावला (वेशभूषा), शैलेश कांबळे (रंगभूषा) यांनी सर्जनशील तांत्रिक सहयोग दिला आहे. वेगळ्या स्वरूपाच्या व कथेला पूरक काम मुंबईच्या अनिकेत मंगरुळकर याने केले आहे.फोटो इमेगो पोस्टर आणि इमेगो फिल्म बाजार या नावाने पाठविले आहेत.

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017kolhapurकोल्हापूर