शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

पर्यटकांच्या सुरक्षेची पोलिसांवर नेहमीच मोठी जबाबदारी - जिवबा दळवी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 1:09 PM

जगाच्या नकाशावर लौकिकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकणार्‍या गोव्यातील कळंगुट किनाऱ्याचा आवाका तसा मोठाच. देश-विदेशी पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने या किनाऱ्यावर पोलिसांना २४ तास डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागते.

ठळक मुद्देदेश-विदेशी पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने या किनाऱ्यावर पोलिसांना २४ तास डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागते.गेली दोन वर्षे या पोलीस स्थानकाचा कारभार सांभाळणारे निरीक्षक जिवबा दळवी यांची अलीकडेच अमली पदार्थविरोधी शाखेत बदली झाली आहे.'कोणत्याही पोलीस स्थानकापेक्षा कळंगुट पोलीस स्थानकात काम करणे, हे तसे मोठ जबाबदारीचे आणि आव्हानाचे काम आहे.'

पणजी : जगाच्या नकाशावर लौकिकप्राप्त पर्यटनस्थळ म्हणून झळकणार्‍या गोव्यातील कळंगुट किनाऱ्याचा आवाका तसा मोठाच. देश-विदेशी पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने या किनाऱ्यावर पोलिसांना २४ तास डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागते. देशात एखादा दहशतवादी हल्ला झाला तर अलर्ट आल्यानंतर आणखी सजग रहावे लागते. पर्यटकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी स्थानिक पोलिसांवर असते.

गेली दोन वर्षे या पोलीस स्थानकाचा कारभार सांभाळणारे निरीक्षक जिवबा दळवी यांची अलीकडेच अमली पदार्थविरोधी शाखेत बदली झाली आहे. दळवी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,  इतर कोणत्याही पोलीस स्थानकापेक्षा कळंगुट पोलीस स्थानकात काम करणे, हे तसे मोठ जबाबदारीचे आणि आव्हानाचे काम आहे. गेली दोन वर्षे पोलिसांनी त्याची जबाबदारी समर्थपणे हाताळल्याबद्दल मला अभिमान आहे. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सतर्कतेचे आदेश आल्यानंतर कळंगुटमध्येही किनाऱ्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला. ते म्हणाले की, पर्यटकांच्या सुरक्षेबरोबरच पर्यटन व्यवसायाशी संबंधित इतर गुन्हेही हाताळावे लागतात. यात ड्रग्स, वेश्याव्यवसाय, तसेच पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार आदींचा समावेश असतो. 

गेल्या दोन वर्षांच्या काळात या पोलीस स्थानकात ही सर्व प्रकरणे दळवी यांनी समर्थपणे हाताळून वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे काम केले आहे. अलीकडच्या एका आंतरराज्य खंडणी प्रकरणात दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दिल्लीत जाऊन दोघांना अटक केली. या प्रकरणी ७ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला होता. रवी रेड्डी मदुरी (३८) या व्यावसायिकाला एका खाजगी अपार्टमेंटमध्ये नेऊन ती जबरदस्तीने दारू पाजून धमक्या देऊन 5, 60, 500 रुपये आपल्या खात्यात हस्तांतरित करण्यास भाग पडले. या प्रकरणात तक्रार नोंद झाल्यानंतर संशयितांचे कॉल डिटेल्स तपासले असता त्यांचे लोकेशन दिल्ली, हरियाना या भागात आढळून आले.

खंडणी उकळल्यानंतर दाबोळी विमानतळावर आपली स्विफ्ट कार ठेवून ते विमानाने पसार झाले होते. पोलिसांनी दाबोळी विमानतळावर कार ताब्यात घेतली घेतली आणि दिल्लीत तपास करून पोलिसांच्या पथकाने प्रविण उर्फ बंटी धानकर (24)आणि इक्बाल उर्फ विनय सिंह (26) यांना अटक केली. त्यांनी पर्वरी येथेही असेच खंडणी प्रकरण केल्याचे निष्पन्न झाले.

देश विदेशी पर्यटकांची वर्दळ असल्याने कळंगुट भाग ड्रग्सच्या बाबतीत तसा संवेदनशीलच. अनेक ड्रग्स प्रकरणेही दळवी यांच्या कारकिर्दीत उघडकीस आली. याच महिन्यात आलमगीर अली मोंडल (26 वर्षे) या युवकास अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला. पर्यटनस्थळ असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीतही अनेक गुन्हे घडतात.  अलीकडेच मुंबईच्या एका महिलेचा समुद्रात स्नान करताना विनयभंग केल्याप्रकरणी सीआरपीएफ जवान राजवीर सिंह (43)याला अटक करण्यात आली.

पर्यटकांना लुटण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात. किनाऱ्यावर पर्यटकांचे बुडून मृत्यू होण्याचे प्रकारही घडतात. ही सर्व प्रकरणे हाताळण्याचा हे मोठे आव्हान पेलावे लागते. त्यामुळे कळंगुट पोलीस ठाण्याच्या निरीक्षकावर नेहमीच मोठी जबाबदारी असते. या सर्व धाकधुकीच्या कामकाजात गेल्या नाताळमध्ये निरीक्षक दळवी यांनी एक अभिनव उपक्रम केला. ख्रिसमसच्या दिवशी येथील वृद्धाश्रमांना भेट देऊन वृद्धांना भेट वस्तू दिल्या त्यासाठी ते स्वतः सांताक्लॉज बनले तसेच पोलिस स्थानकातही कार्यक्रम केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत झाले. दुचाकी वाहनधारकांमध्ये हेल्मेट तसेच इतर नियमांच्या बाबतीत जागृती आणण्यासाठी त्यांनी नाताळात सांताक्लॉजला सोबत घेऊन मार्गदर्शन केले.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस