गद्दारांना पुन्हा संधी नाहीच; पक्षाचे कार्य पुढे नेणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2024 12:51 PM2024-09-15T12:51:40+5:302024-09-15T12:52:30+5:30
पक्षांतराविरोधात निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा :काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येत भाजपात प्रवेश केलेल्या गद्दारांना भविष्यातही पक्षाची दारे बंद राहणार आहेत. त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. पक्ष संघटनेत सक्रियपणे सहभागी होऊन पक्षाचे कार्य पुढे नेणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यावर विचार केला जाईल. २०२७ च्या निवडणुकीत काँग्रेसला २७ जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.
काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. या पक्षांतराला शनिवारी दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त कळंगुट येथील डॉल्फिन सर्कलजवळ काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी पाटकर बोलत होते. त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅड. कार्ल्स फेरेरा, उत्तर गोवाचे अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, कळंगुट, साळगाव तसेच शिवोली गट समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या नेत्यांनी हातात फलक घेऊन त्या आमदारांविरोधात घोषणा दिल्या तसेच प्रतीकात्मक पुतळ्याचेही दहन करून आमदारांचा निषेध व्यक्त केला. भविष्यात त्या आठही आमदारांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले. पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
१४ सप्टेंबर हा गोव्यातील राजकारणातील काळा दिवस असून भाजपात प्रवेश केलेल्या त्या सर्व केल्याचा आरोपही पाटकरांनी केला. ' भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर भूरूपांतरही केल्याचा आरोप केला. या गद्दारांना भविष्यात पक्षाची दारे कायमची बंद करण्यात आल्याचे ते म्हणाले.
भाजपात प्रवेश करताना सर्व आठही आमदारांनी विकासाच्या नावावर प्रवेश केल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात वैयक्तिक स्वार्थासाठी ते भाजपात गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सभापतींकडे प्रलंबित असलेल्या अपात्र याचिकेवर सभापतींनी ९० दिवसांत योग्य निर्णय घ्यावा, न पेक्षा सर्वोच्च न्यायालय त्यावर सुनावणी घेऊन निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयाकडून हे सर्व आमदार अपात्र ठरवले जातील, असाही दावा काँग्रेसकडून करण्यात आला.
लोबोंना पराभव दिसला होता : कालुर्स फेरेरा
आपण भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली तर आपला पराभव निश्चित असल्याचे मायकल लोबो यांना ज्ञात होते. त्यामुळे पराभव टाळण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश मिळवला. प्रवेश करताना पुन्हा भाजपात प्रवेश करणार नसल्याची ग्वाही लोबो यांनी दिली होती. लोकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा घात करून ते पुन्हा भाजपात गेले, असे फेरेरा यावेळी म्हणाले.
लोकांसह देवाचाही विश्वासघात केला
काँग्रेस सोडून जाणार नसल्याचे देवासमोर वचन देऊनही 'त्या' ८ आमदारांनी ५०-५५ कोटी घेत भाजपात प्रवेश केल्याचा त्यांच्यावर आरोप होत असून त्यांनी लोकांचाच नव्हे, तर देवाचासुद्धा विश्वासघात केला आहे. काँग्रेस सोडून भाजपात गेलेल्या आमदारांनी पैसे घेऊन फक्त स्वतःचाच विकास केला. अशा नेत्यांवर लोकांनी विश्वास न ठेवता त्यांना लोकशाहीतून बाहेर ठेवण्याची गरज आहे, असे दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. त्या पक्षांतराचा निषेध करण्यासाठी शनिवारी काँग्रेस नेत्यांनी मुरगाव नगरपालिकेसमोर एकत्र येत त्या आठ आमदारांविरुद्ध घोषणा देत निषेध व्यक्त केला. काँग्रेस सोडून भाजपात गेलेले मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या प्रतिमेचेही दहन करण्यात आले. खासदार फर्नांडिस म्हणाले की, दोन वर्षापूर्वी काँग्रेसच्या त्या' आठ आमदारांनी लोकशाहीचा खून केला. भाजपात जाण्यासाठी त्या आमदारांनी पैसे घेतले, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. आता त्या' आमदारांना भाजप खंडणी वसूल करण्यासाठी वापरत आहे. त्यामुळे विकासासाठी काम न करता ते धमकी देण्याचा प्रकार करतात. यावेळी काँग्रेसचे नेते नितीन चोपडेकर, ओलेन्सियो सीमोईस, ओरवील दोरादो आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
पूर्वी मुख्यसचिव, नंतर पोलिस महासंचालक आणि आता मत्स्यपालन विभागाच्या संचालकांनी चुकीचे काम केल्यानंतर त्यांच्यावर योग्य कारवाई न करता त्यांची करण्यात आली. लष्करात जसे कोर्ट मार्शल करून जाते. त्याचप्रमाणे करणाऱ्या कारवाई केली चुकीचे काम अधिकाऱ्यांवरही योग्य कारवाई केली पाहिजे, असे खासदार फर्नाडिस म्हणाले.