शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

मनोहर पर्रीकर-लोबो यांच्या मैत्रीला 10 वर्षात प्रथमच ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 1:19 PM

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि कळंगुटचे वादग्रस्त ठरलेले आमदार मायकल लोबो यांची सगळी कारकीर्द जरी वादांचीच असली तरी, पर्रीकर आणि लोबो यांच्यातील मैत्री मात्र ब-याच काळापासूनची आहे.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि कळंगुटचे वादग्रस्त ठरलेले आमदार मायकल लोबो यांची सगळी कारकीर्द जरी वादांचीच असली तरी, पर्रीकर आणि लोबो यांच्यातील मैत्री मात्र ब-याच काळापासूनची आहे. लोबो यांनी आपल्या कारकीर्दीत प्रथमच मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर टीका केल्यामुळे स्वाभाविकपणे या दोन्ही नेत्यांमधील संबंधांना तडे गेल्याचे मानले जात आहे. पर्रीकर व लोबो यांच्यातील मैत्रीला ग्रहण कधी लागले तेच कळून आले नाही, अशा प्रकारची चर्चा भाजपाच्या आतिल गोटात सुरू आहे.

लोबो हे आमदार झाले तेव्हापासून विविध वाद निर्माण करण्याचे काम सुरू झाले पण लोबो यांची कळंगुटमधील लोकप्रियता गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यत तरी कमी झाली नव्हती. कळंगुटमध्ये काही हजार ख्रिस्ती मतदार आहेत. तिथे 2012 सालापर्यंत कधीच भाजपाचा उमेदवार जिंकला नव्हता. लोबो हे भाजपच्या तिकिटावर दोनवेळा कळंगुटमध्ये जिंकले व पर्रीकर यांचा त्यामुळे लोबो यांच्यावर विश्वास वाढला. 

लोबो यांनी भाजपावर व पर्रीकर यांच्यावर गेल्या आठवड्यात केलेली मोठी टीका ही भाजपाच्या कोअर टीमसाठी तापदायी ठरली. त्या अर्थाने भाजपाचे माजी आमदार विष्णू वाघ यांची जागा आता लोबो यांनी घेतलेली असल्याचे भाजपामधील अनेकांना वाटू लागले आहे. लोबो यांनी भाजपाची माफी मागायला हवी, अशी मागणी सोशल मीडियावरून काही भाजपा कार्यकर्ते करू लागले आहेत.

लोबो यांनी गोव्याचे प्रशासन ठप्प झालेय व हजारो युवक सरकारी नोक-यांपासून दूर राहिले यास पर्रीकर जबाबदार ठरतात अशा अर्थाची टीका गेल्या आठवड्यात केली होती. गोव्याचा खाणप्रश्न सुटत नसल्याने भाजपाच्या दोन्ही खासदारांनी पुन्हा निवडणूकच लढवू नये असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी लोबो यांना दिल्लीत बोलावून घेतले व त्यांच्याशी चर्चा केली. पर्रीकर हे लोबो यांच्यावर नाराज झाले. पर्रीकर व लोबो यांच्यातील संबंधांमध्ये कटुता येण्याचा प्रकार गेल्या दहा वर्षात प्रथमच घडला आहे. आपण व पर्रीकर हे एकाच पर्रा गावचे आहोत. आपण दरवर्षी न चुकता गणोशोत्सवावेळी पर्रीकर यांच्या घरी जातो.  भाजपाचा सदस्य नव्हतो, तेव्हाही आपण पर्रीकर यांच्या घरी जात असे, असे लोबो अनेकदा सांगतात. पर्रीकर हे केंद्रात संरक्षण मंत्री असतानाही लोबो अनेकदा दिल्लीत जाऊन पर्रीकर यांना भेटायचे. पर्रीकर यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी ते पर्रीकरांसोबत जेवणही घ्यायचे. पर्रीकर व लोबो यांच्यातील मैत्री ही अनेकदा चांगल्या अर्थाने गोव्यात चर्चेचा विषय ठरलेली आहे. मात्र आता दोघांचेही संबध वेगळ्य़ा वळणावर आले आहेत. 

लोबो यांना भाजपामध्ये पर्रीकर यांनीच आणले होते. भाजपाला ख्रिस्ती उमेदवार जास्त संख्येने हवे असा विचार करून मुख्यमंत्री पर्रीकर यांनी लोबो, ग्लेन तिकलो, निलेश काब्राल, कालरुस आल्मेदा, स्वर्गीय माथानी साल्ढाणा यांना भाजपामध्ये आणले व हे सगळेजण भाजपच्या तिकिटावर जिंकले होते. एवढेच नव्हे तर फ्रान्सिस डिसोझा या ज्येष्ठ नेत्यालाही पर्रीकर यांनीच भाजपामध्ये आणले व डिसोझा हेही कायम भाजपाच्या तिकिटावर जिंकले. लोबो यांच्यासारखे आमदार म्हणजे भाजपचा ख्रिस्ती चेहरा ठरले. अशा आमदारांमुळे भाजपाच्या कमळाला गोव्यात ख्रिस्ती मते मिळण्यास मोठा हातभार लागला. मात्र लोबो हे सद्या मात्र भाजपच्या रोषास कारण ठरले आहेत.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा