शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

गोव्यात एका फुटबॉल सामन्यासाठी पोलीस सुरक्षेवर 31 लाखांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 6:27 PM

एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य लेस्टर फर्नाडिस याला मारहाण केल्यामुळे एफसी गोवा क्लबसाठी काही प्रमाणात महागडी ठरलेली गोवा पोलिसांची सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षातही बरीच महागडी असल्याचे सिद्ध झाले आहे.

मडगाव - एफसी गोवा फॅन क्लबचा सदस्य लेस्टर फर्नाडिस याला मारहाण केल्यामुळे एफसी गोवा क्लबसाठी काही प्रमाणात महागडी ठरलेली गोवा पोलिसांची सुरक्षा यंत्रणा प्रत्यक्षातही बरीच महागडी असल्याचे सिद्ध झाले आहे. एका सामन्यासाठी एफसी गोवा या पोलीस यंत्रणोसाठी तब्बल 31 लाख रुपये खर्च करत असून एवढी महागडी सुरक्षा यंत्रणा  आम्हाला परवडत नाही असा दावा या फ्रेन्चाईजी क्लबने केला आहे.

आतापर्यंत मागच्या चार मौसमात एफसी गोवा संघाच्या मालकाला सुरक्षा यंत्रणोपोटी गोवा पोलिसांकडून 9.70 कोटींचे बिल आले असून, त्यापैकी 7.30 कोटी रुपयांचा भरणा क्लबने केला आहे. मात्र हे पैसे फेडताना क्लबने आपला निषेधही नोंदविला आहे. पुणे-मुंबईच्या तुलनेतही गोव्यातील पोलिसांची सुरक्षा यंत्रणा बरीच महाग असल्याचे या क्लबने मुख्यमंत्री कार्यालयाला लिहिलेल्या पत्रत म्हटले आहे.गुवाहाटीत अशी सुरक्षा देण्यासाठी नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी क्लबला तसेच जमशेदपूरमध्ये यजमान जमशेदपूर एफसी क्लबला सामन्यादरम्यान पोलीस यंत्रणेला एकही पैसा द्यावा लागत नाही. पुणे, मुंबई व बंगळुरू येथेही पोलीस सुरक्षेची दर सामन्यामागची फी दोन लाखाच्या आसपास असते. मात्र गोव्यातच केवळ पोलीस बंदोबस्तासाठी  एफसी गोवा क्लबला 24 लाख द्यावे लागतात. तर वाहतुक यंत्रणा सांभाळण्यासाठी वाहतूक पोलिसांना तसेच बॉम्ब डिस्पोजल पथकाच्या पोलिसांची फी पकडल्यास दर सामन्यामागे या यंत्रणोसाठी 31 लाख द्यावे लागतात.सध्या एफसी गोवा क्लब कॅसिनोमालक जयदेव मोदी हे चालवित आहेत. मात्र त्यांना या क्लबचे जुने मालक दत्तराज साळगावकर व श्रीनिवास धेंपे यांनी सुरक्षे यंत्रणोपोटी थकवून ठेवलेली बाकीही भरावी लागली आहे. 2014 साली सुरक्षा यंत्रणोपोटी 1.50 कोटींचे बील आले होते. 2016 साली हा आकडा 3.20 कोटींवर पोहोचला. 2016 साली 1.70 कोटी तर 2017 मध्ये 3.30 कोटी रुपयांचे बील सुरक्षेपोटी या क्लबला भरावे लागले आहेत.दर सामन्यामागे फातोर्डा स्टेडियमवर बंदोबस्तासाठी 600 पोलीस तैनात केले जातात. त्यासाठी दोन पाळ्यात यजमान क्लबला शुल्क भरावे लागते. देशातील इतर भागात जसे शुल्क आकारले जाते त्याप्रमाणो गोव्यातही आकारले जावे अशी मागणी क्लबकडून करण्यात आली आहे. या मागणीवर विचार करण्यासाठी गोवा सरकारने क्रीडा खात्याचे सचिव जे. अशोककुमार यांच्यासह वित्त खात्याचे अतिरिक्त सचिव आणि पोलीस मुख्यालय अधीक्षक अशी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. या बाबतीत सध्या 600 ऐवजी 550 पोलीस सामन्याच्यावेळी तैनात करावे आणि दोन पाळ्याऐवजी दीड पाळीचे भाडे आकारावे असा तात्पुरता तोडगा पुढे आला आहे.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस