लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई : ग्रामीण भागातील वनसंपदा तसेच ग्रामीण संस्कृती हीच खरी गोव्याची ओळख आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काल सत्तरीतील भेटीत केले.
राज्यपालांनी काल साखळी येथील दत्त मंदिर, भूमिका मंदिर पर्ये, मार्ले व डोंगुर्ली ठाणे येथील मंडळगिरो व कोळगिरो मंदिराला भेट दिली. त्या भेटीत त्यानी दोनशे वर्षे जुनी झाडांचा परिचय करून घेतला. त्याची ही भेट सैनिक दायज यात्रा अंतर्गत होती. पिल्लई यावेळी म्हणाले की, सत्तरीतील गावात अनेक अशी झाडे आहेत ती गेली अनेक वर्षे उभी आहेत. त्या झाडाची ओळख जाणून घेणे काळाची गरज आहे. मार्ले येथील झाडांची ओळख करून दिली.
पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी राज्यपाल पिलाई यांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, सत्तरी असा तालुका आहे की, ज्या तालुक्यातील विविध गावात अनेक औषधी वनस्पती तसेच विविध गुणधर्म असलेली झाडे पहावयास मिळतात. सत्तरी हा औषधी गुणधर्म असलेला तालुका आहे. पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी यावेळी दोनशे ते तीनशे वर्षे असलेल्या झाडांची माहिती दिली. ठाणे डोंगुर्ली येथे असलेल्या जाभंळ, घोटींग व पिंपळ झाडांची माहिती दिली.
गोळा झाल्यावर जे पुस्तक येईल ते या भागातील लोकांना मोफत दिले, जाईल असे सांगितले. यावेळी सरपंच सरिता गांवकर, जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस व सरकारी अधिकारी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"