पणजी: अमलीपदार्थ विरोधी पथकाने मोरजी येथे मोठी कारवाई करुन १ कोटी रुपयांचा ड्रग्स जप्त केला आहे. या प्रकरणी रशियन नागरिकाला अटक करण्यात आली.
त्याच्याकडून उच्च दर्जाचे डायडपोनिक्रो व्हीड, चरस व एलएसडी मिळून १ कोटी ७५ हजार रुपयांचा ड्रग्स जप्त केला आहे. माेरजी येथे ड्रग्स चा व्यवहार होणार असल्याच्या खात्रीलायक माहितीच्या आधारे अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी संशयित रशियन नागरिका विरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मारेजी हा किनारी भाग असून या ठिकाणी अनेक देश विदेशी पर्यटक येतात. त्यातच डिसेंबर मध्ये नाताळ व नववर्षा निमित पर्यटकांची संख्या बरीच वाढली आहे.त्यामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांना पुरवण्याच्या उद्देशाने संशयिताने हा ड्रग्स आणल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच यात संशयिताचे आणखीनही साथीदार आहेत, का ? त्यादृष्टीनेही पोलिस तपास करीत आहे. दरम्यान अमलीपदार्थ विराेधी पथकाकडून संशयित रशियन नागरिकाची कसून चौकशी केली जात आहे. त्याला सध्या पोलिस कोठडीत पाठवले आहे.