शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मनोहर उसगावकर: कायदा क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2023 9:42 AM

संपादकीयः मनोहर उसगावकर यांच्यासारखे ज्येष्ठ वकील हे दीपस्तंभ होते.

गोव्यात वकिलांची फौज खूप मोठी आहे. न्यायालयांची संख्याही वाढलीय आणि वकिलांचे प्रमाणही अमर्याद आहे. मात्र, आपल्या क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेऊन आणि विविध कायद्यांचा, निवाड्यांचा सखोल अभ्यास करून त्याविषयी अधिकारवाणीने बोलू शकतील, असे वकील खूप कमी आहेत. मनोहर उसगावकर यांचे काल सकाळी निधन झाले आणि पूर्ण गोव्याचे लक्ष त्या घटनेकडे वेधले गेले. उसगावकर यांच्या सक्रियतेचा काळ वेगळा होता. मात्र, गोव्यातील वकिलांच्या दोन तीन पिढ्या त्यांच्या हाताखाली किंवा मार्गदर्शनाखाली घडल्या. 

कायदा क्षेत्रातील ते ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. २०१६ साली आत्माराम नाडकर्णी देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल झाले. तेव्हा नाडकर्णी यांचे अनेकांनी अभिनंदन केले. नाडकर्णी बुद्धिमान वकिलांच्या परंपरेतून पुढे आले. उसगावकर यांनी त्या परंपरेचा गोव्यात आरंभ केला होता. उसगावकर हेही एकेकाळी राज्याचे अॅडव्होकेट जनरल होते. १९९६ साली उसगावकर यांनाही देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपद मिळाले होते. त्याकाळी फेसबुक व अन्य सोशल मीडियांचा जन्म झाला नव्हता. उसगावकर साध्या राहणीसाठी व मनमिळावू वागण्यासाठी ओळखले गेले. सारस्वत कुटुंबातून आलेल्या उसगावकर यांचा पोर्तुगीज कायद्यांचा अभ्यास जबरदस्त होता. ती देणगी वा विद्वत्ता गोव्यात दुसऱ्या कोणा वकिलाच्या ठायी आढळली नाही. मनोहर उसगावकर यांनी एखाद्या प्रकरणी एखादा सल्ला देणे म्हणजे जणू तो हायकोर्टाचा निवाडाच आहे, असे मानून काही लोक चालायचे. 

उसगावकर यांच्या सहवासात आलेले अनेक तरुण वकील सांगतात की, उसगावकर म्हणजे स्वत: एक संस्थाच होते. कायद्याची संस्था. गोव्यात काही मामलेदारांकडे, उपजिल्हाधिकाऱ्यांकडे एलएलबी, एलएलएमच्या पदव्या खूप आहेत. मात्र, त्या सर्वांना कायद्याचे नीट ज्ञान असतेच असे नाही. केवळ पुस्तकी ज्ञानातून कशाबशा पदव्या प्राप्त केलेल्या घटकांमुळे प्रशासकीय पातळीवर सरकारचे अपयश अनेकदा उघड होत आहे. कुळ-मुंडकार खटले लवकर निकालात निघत नाहीत. गरिबांना मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये फक्त खेपाच माराव्या लागतात. काही वकील व काही मामलेदार वगैरे आपले ज्ञान भाटकारांच्या सेवेसाठी व फायद्यासाठी वापरतात. एलएलबी शिक्षित काही अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळेही काहीवेळा न्यायालयात सरकारला फटके सहन करावे लागले आहेत. 

मनोहर उसगावकर यांच्यासारखे ज्येष्ठ वकील हे दीपस्तंभ होते. बडेजाव किंवा थाटमाट याचा सोस नसलेला हा माणूस पणजीच्या फुटपाथवरदेखील कुणाला भेटला तर उभा राहून मस्त गप्पा करायचा. आपल्या मूळ घरी गणेश चतुर्थीला या, असे निमंत्रण द्यायचा. अनेकांनी काल फेसबुकवर उसगावकर यांच्या जीवनशैलीविषयीच्या हृद्य आठवणी लिहिल्या आहेत. व्यासंग, विद्वत्ता याविषयी उसगावकर यांना कुणीही सलाम करावा, असे ते व्यक्तिमत्त्व होते. म्हापसा अर्बन बँकेचे ते संस्थापक सदस्य होते. खलप यांनात्यांनीच प्रथम म्हापसा अर्बनची खुर्ची दाखवली होती. गोव्यात रोटरी चळवळ आणण्यातही उसगावकर यांचा वाटा होता. कायद्याची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. आयरिश रॉड्रिग्ज सांगतात त्याप्रमाणे पोर्तुगीज कायद्यांचा उसगावकर यांनी केलेला अनुवाद हा अनेक वकिलांना आज खूप उपयुक्त ठरत आहे. पुढील पिढीलाही त्यापासून फायदा होईल. अनेकदा सामान्य माणूस पोर्तुगीज कागदपत्रांतील मजकुराचा अर्थ कळत नसल्याने गोंधळतो. तो इथे तिथे धावतो. 

अनेक बड़े आसामी याबाबत उसगावकर यांचे मार्गदर्शन घ्यायचे. उसगावकर हे खऱ्या अर्थाने गोंयकार होते. एखाद्याने केवळ पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी केली म्हणून ती व्यक्ती पोर्तुगीज नागरिक होत नाही. त्या व्यक्तीने पोर्तुगीज पासपोर्ट प्राप्त केला, तर मात्र गोष्ट वेगळी ठरते, असे उसगावकर जाहीरपणे नमूद करायचे. गोव्यातील विविध स्थित्यंतरे उसगावकर यांनी पाहिली, अनुभवली. ते चांगलं संपन्न आयुष्य जगले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच अनेकांनी तेथे कर माझे जुळती, असे मनोमन म्हणत हात जोडले. कायद्याच्या आघाडीवरील गोव्यातील एक पर्व काल संपले.

टॅग्स :goaगोवा