शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

गोव्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा उद्यापासून गळीत हंगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 1:59 PM

गोव्यातील एकमेव सहकारी कारखाना : गत साली ४७,३८७ टन ऊस गाळप

पणजी : गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम मंगळवारपासून (14 नोव्हेंबर) सुरू होत आहे. या वर्षी गोव्यातील ५0 हजार टन आणि शेजारी कर्नाटकातील १ लाख टन मिळून दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याचे प्रशासक उमेशचंद्र जोशी यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

गेल्या वर्षी ४७,३८७ टन ऊस गाळप झाले होते व त्यातून ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. ७ हजार टन स्थानिक ऊस आणि सुमारे ४0 हजार टन शेजारी राज्यातील ऊसाचे गाळप झाले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अलिकडेच कारखान्याचे आधुनिकीकरण लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते त्या पार्श्वभूमीवर कामेही सुरू झाली आहेत.

प्राप्त माहितीनुसार गत साली ऊस गाळपातून सुमारे ८.३८ टक्के इतका उतारा मिळाला आणि ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. यंदा रामनगर, हल्याळ, अळणावर, हेब्बाळ आदी भागांबरोबरच यावर्षी खानापूर येथूनही ऊस आयात करण्याचे ठरले आहे.

कोल्हापूरचे साखरतज्ज्ञ सल्लागार?सरकारने ऊस उत्पादकांना आधारभूत दर प्रती टन ५00 रुपयांनी वाढवून दिला आहे. कारखान्याकडून १२00 रुपये तर सरकारकडून १८00 रुपये असे एकूण ३ हजार रुपये प्रती टन उत्पादकांना आता मिळतील. यापूर्वी सरकारकडून १३00 रुपये आणि कारखान्याकडून १२00 रुपये मिळून अडीच हजार रुपये दिले जात असत. कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे.

त्यांना या क्षेत्रात तब्बल ३४ वर्षांचा अनुभव आहे. कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च येतो, अशी माहितीही जोशी यांनी दिली. इथॅनॉल, बायोगॅसची निर्मिती करुन कारखाना नफ्यात आणता येईल, असे गेल्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी सूचविले आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २0१६-१७ च्या गळीत हंगामात राज्यात ४0,२३४ टन ऊस उत्पादन झाले आणि हा ऊस संजीवनी सहकारी साखर कारखान्याला पुरविण्यात आला. आधी अडीच हजार रुपये प्रति टन आधारभूत दर दिला जात होता त्यात आता ५00 रुपयांची भर पडली आहे.

शेजारी राज्यावरच अवलंबनसंजीवनी साखर कारखान्याची गरज गोव्यात उत्पादन होणा-या ऊसातून भागत नाही. त्यामुळे शेजारी कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून ऊस मागवावा लागतो. गोव्यातील ऊस लागवड क्षेत्र गेल्या काही वर्षांच्या काळात स्थिर राहिलेले आहे. संजीवनी साखर कारखाना हा सहकार क्षेत्रातील एकमेव कारखाना आहे. मात्र या कारखान्याला पुरेसा ऊस मिळत नाही. ऊस उत्पादनवाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. नवीन जागा लागवडीखाली आणण्यासाठी प्रती हेक्टर १0 हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. मजूर खर्चावर हेक्टरी ५0 टक्के किंवा १0 हजार रुपये जी रक्कम कमी असेल ती दिली जाते. गळीत हंगामाच्या उद्घाटनासाठी उद्या स्थानिक आमदार तथा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर तसेच सांगेचे आमदार प्रसाद गांवकर उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा