शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सार्दिन यांचे लॉबींग  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 12:34 PM

Goa Congress News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळावे म्हणून खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी लॉबींग सुरू केले आहे. सार्दिन यांनी दिल्लीतही संपर्क साधला व प्रदेशाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावण्यास आरंभ केला आहे.

पणजी - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळावे म्हणून खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी लॉबींग सुरू केले आहे. सार्दिन यांनी दिल्लीतही संपर्क साधला व प्रदेशाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावण्यास आरंभ केला आहे.गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा यावेळी स्वीकारला जाणार आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्याकडे राजीनामा पत्र पोहचले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी काँग्रेसच्या कोणत्याच आमदाराने चोडणकर यांना सहकार्य केले नाही. फक्त विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सहकार्य केले. मात्र जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होताच आमदारांनी चोडणकर यांना दोष देण्यास आरंभ केला. यामुळे कंटाळून चोडणकर यांनी राजीनामा दिला असे चोडणकर यांचे मित्र असलेल्या काँग्रेसच्या काही माजी पदाधिकाऱ््यांनी गुरुवारी लोकमतला सांगितले.माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, रवी नाईक, प्रतापसिंग राणे यांच्या क्षेत्रात काँग्रेसच्या काही उमेदवारांचे पराभव झाले. मात्र या आमदारांनी पराभवाची जबाबदारी घेतली नाही याची कल्पना काहीजणांनी दिनेश गुंडू राव यांना दिली आहे. चोडणकर यांनी दुसऱ््यांदा राजीनामा दिला आहे. तो स्वीकारल्यानंतर सार्दिन यांनी प्रदेशाध्यक्षपद आपल्याला मिळावे म्हणून प्रयत्न चालवले आहेत. स्वत: सार्दिन यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी काँग्रेसचे काम कुठेच केले नाही. ते स्वत: दक्षिण गोव्याचे खासदार आहेत पण त्यांनी निवडणुकीवेळी कोणतीच भूमिका घेतली नाही. काँग्रेसच्या काही आमदारांना पक्षाच्या निशाणीवर जिल्हा पंचायत निवडणूक झालेली नको होती. फालेरो यांचा उमेदवार दवर्लीत पराभूत झाला. फालेरो हेही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी लॉबींग करत आहेत.चोडणकर यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा एक गट करत असला तरी, चोडणकर हे राजीनाम्यावर ठाम आहेत. काँग्रेसची प्रदेश समिती विसर्जित झाल्यात जमा आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवा