लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : म्हादई वाचली तरच पर्यावरण, मनुष्य जीव आणि वाघ जगणार आहे. त्यासाठी प्रथमच पेडणे तालुका नागरिक समिती आणि म्हादई वाचवा संघटनेमार्फत बुधवारी (दि. २६) पूर्ण पेडणे तालुक्यात जनजागृतीची मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सभा घेण्यात होईल.
म्हादई ही जीवनदायिनी आहे. तिला संरक्षण देण्यासाठी आता पेंडणे तालुका नागरिक समिती आणि 'मिशन सेव्ह टायगर, सेव्ह म्हादई' या संघटनांनी तालुक्यात बुधवारी सकाळी ९:३० वाजता मोटारसायकल रॅली काढून प्रत्येक ग्रामपंचायतीला निवेदन; तसेच पालिकेला निवेदन देण्यात येणार आहे. संपूर्ण तालुक्यात ही मिरवणूक काढण्यात येईल. या कार्यक्रमाची सुरुवात कोरगावमधून होणार आहे आणि कोरगाव पंचायतीला निवेदन दिल्यानंतर केरी पालये, हरमल, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, पार्से, तुये, विर्नोडा, धारगळ, कासारवर्णे, हळर्ण, तळर्ण, वझरी, चांदेल-हसापूर, इब्रामपूर, तांबोसे, तोरसे, वारखंड, न्हयबाग या वीस ग्रामपंचायत आणि एक पेडणे नगरपालिकेला निवेदन दिल्यानंतर या मिरवणुकीचे सभेमध्ये रूपांतर होणार आहे.
ही सभा पेडणे बसस्थानकाकडे आयोजित करण्यात आली, अशी माहिती मिशन सेव्ह टायगर, सेव म्हादई संघटना व पेडणे तालुका नागरिक समितीने दिली आहे
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"