शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

ं२०१२ सालीच उघडकीस आला होता घोटाळा

By admin | Published: July 23, 2015 2:05 AM

पणजी : गोव्यात १०३५ कोटी रुपये खर्चाच्या ‘जैका’ पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण-विषयक कामांच्या निविदा जारी करण्याची प्रक्रिया २००७ साली सुरू

पणजी : गोव्यात १०३५ कोटी रुपये खर्चाच्या ‘जैका’ पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण-विषयक कामांच्या निविदा जारी करण्याची प्रक्रिया २००७ साली सुरू झाली होती. साधारणत: २०११ साली कामांचे आदेश दिले गेले व २०१२ साली कामे सुरू झाली. तथापि, २०१२च्या आसपास जैकाचा कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा उघडकीस आला होता; पण त्या वेळी सरकारने त्याविरुद्ध काहीच केले नाही, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सीने गोव्यातील पाणीपुरवठा व मलनिस्सारणविषयक कामांसाठी निधी उपलब्ध करण्याची कल्पना प्रथम २००३ साली मांडली होती. २००७ साली काँग्रेसचे सरकार अधिकारावर असताना निविदा प्रक्रियांना आरंभ झाला होता; पण २०१२ सालच्या मार्च महिन्यापर्यंत बांधकाममंत्री असलेल्या चर्चिल आलेमाव यांनी कामाचे आदेश जारी करण्यासाठी विलंब लावला होता. निविदा जारी करून पुढील प्रक्रियाही पार पाडली गेली, तरी कामाचे आदेश मात्र दिलेच जात नव्हते. त्यामुळे २००८ सालापर्यंत जैकाची जी कामे सुरू व्हायला हवी होती, ती झालीच नव्हती. बांधकाम खात्यातील काही अभियंतेही त्या वेळी वैतागले होते. कंत्राटदारांना कामाचे आदेश लवकर दिले जावेत, असे त्या अधिकाऱ्यांनाही वाटत होते. मार्च २०१२ साली निवडणुका होऊन काँग्रेसचा पराभव झाला. आलेमावही पराभूत झाले. या निवडणुकांच्या जरा अगोदर कळंगुट व अन्य काही किनारी भागांमध्ये जैकाची कोट्यवधी रुपयांची कामे करण्यासाठीचे आदेश देण्यात आले; पण कामे मार्चनंतर भाजप सरकार अधिकारावर येताच सुरू झाली. मार्चमध्ये नव्या सरकारला जैकाचा घोटाळा कळून आला होता. आनंद वाचासुंदर हेच त्या वेळी जैका विभागाचे प्रकल्प संचालक होते. निविदांवेळी खर्चाची रक्कम प्रचंड वाढविण्यात आल्याचे नव्या सरकारच्या लक्षात आले होते. मात्र, त्या वेळी फक्त कामांवरील खर्च ४० कोटी रुपयांनी कमी करून घेण्यात आला. त्या वेळी कुठल्याच अधिकाऱ्याविरुद्ध साधी शिस्तभंगाची चौकशीही सरकारने केली नाही. सरकारचे ४० कोटी रुपये आपल्यामुळे वाचले, असा दावा मार्च २०१२ मध्ये अधिकारावर आलेले सरकार करते; पण २०१२ साली घोटाळा उघडकीस आला होता, तेव्हा सरकारने चौकशी का सुरू केली नाही, ते अस्पष्टच आहे. (खास प्रतिनिधी)