शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

By समीर नाईक | Published: October 09, 2023 7:16 PM

पाहा, क्रीडा प्रकारांचे सविस्तर वेळापत्रक

समीर नाईक, पणजी: राज्यात २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. २६ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन असले तरी १९ ऑक्टोबरपासून काही सामन्यांना सुरुवात होणार आहे. या अनुषगांने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बॅडमिंटन खेळाने १९ ऑक्टोबरपासून ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील क्रीडाप्रकाराना सुरूवात होत आहे. बॅडमिंटनसोबत रग्बी, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅन्काक सिलाट, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, मॉर्डन पँटाथ्लॉन आणि बास्केटबॉल स्पर्धेच्या आयोजनाला उद्घाटनापूर्वी सुरूवात होणार आहे.

क्रीडा प्रकारांचे सविस्तर वेळापत्रक पुढील प्रमाणे. 

ताळगाव डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम : बॅडमिंटन १९ ते २४ ऑक्टोबर, फॅन्सिंग २६ ते ३० ऑक्टोबर, आणि व्हॉलीबॉल १ ते ५ नोव्हेंबर. बांबोळी, ॲथलेटिक स्टेडियम : रग्बी २५ ते २७ ऑक्टोबर आणि ॲथलेटिक्स २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर. हवाई बीच दोनापावल : रोविंग आणि यॉटिंग ३ ते ८ नोव्हेंबर. करंझाळे मिरामार रोड : ट्रायथ्लोन ४ ते ७ नोव्हेंबर. मिरामार बीच/ वार्का बीच : बीच हँडबॉल २ ते ६ नोव्हेंबर, बीच व्हॉलीबॉल ४ ते ७ नोव्हेंबर, आणि मिनी गोल्फ १ ते ३ नोव्हेंबर. कांपाल इनडोअर स्टेडियम : नेटबॉल २२ ते २७ ऑक्टोबर, टेबलटेनिस ३ ते ७ नोव्हेंबर, कबड्डी ४ ते ८ नोव्हेंबर. जलतरण संकुल कांपाल : जलतरण २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर. कांपाल क्रीडा ग्राम : वेटलिफ्टिंग २५ ते २९ ऑक्टोबर, वुशू १ ते ४ नोव्हेंबर, ज्युडो ६ ते ८ नोव्हेंबर, पॅन्काक सिलाट २६ ते २९ ऑक्टोबर, गटका ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, योगासन ५ ते ९ नोव्हेंबर, मल्लखांब २६ ते २८ ऑक्टोबर, कुस्ती ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, लगोरी ५ ते ६ नोव्हेंबर, कलारीपय्याटू ७ व ८ नोव्हेंबर. शापोरा नदी : रोविंग २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर, कॅनोईंग व कायाकिंग ३ ते ६ नोव्हेंबर. पेडे बहुउद्देशीय इनडोअर हॉल : जिम्नॅस्टिक्स २३ ते २८ ऑक्टोबर, बॉक्सिंग १ ते ८ नोव्हेंबर, बिलियर्ड्स अँड स्नूकर २७ ते ३० ऑक्टोबर. हॉकी मैदान पेडे : हॉकी ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर. मांद्रे यश शूटिंग अकादमी : शूटिंग २ ते ९ नोव्हेंबर. फोंडा क्रीडा संकुल : मॉर्डन पँटाथ्लॉन २६ ते २९ ऑक्टोबर, तायक्वांदो ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, खो-खो ४ ते ८ नोव्हेंबर. अभियांत्रिकी कॉलेज फर्मागुडी : तिरंदाजी २७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर. फातोर्डा पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियम: फुटबॉल (पुरूष) ३० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर. बहुउद्देशीय मैदान, फातोर्डा: लॉन टेनिस ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर. इनडोअर हॉल, फातोर्डा: सॅपेकटॅकरो ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर, आणि स्क्वे मार्शल आर्ट ६ ते ८ नोव्हेंबर. मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, नावेली : बास्केटबॉल २३ ते २८ ऑक्टोबर, रोलबॉल ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, हँडबॉल ४ ते ८ नोव्हेंबर. कोलवा बीच : बीच फुटबॉल २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर. वेर्णा बिर्ला बायपास एअरपोर्ट रोड : सायकलिंग रोड रेस ८ ते ९ नोव्हेंबर. चिखली मल्टिपर्पझ स्टेडियम: लॉन बॉल्स १ ते ८ नोव्हेंबर. चिखली स्क्वॉश फॅसिलिटी: स्क्वॉश १ ते ५ नोव्हेंबर. टिळक फुटबॉल मैदान, वास्को: फुटबॉल (महिला). दिल्ली गोफ क्लब : गोल्फ ५ ते ९ नोव्हेंबर. इंदिरा गांधी स्टेडियम संकुल, दिल्ली: सायकलिंग ट्रॅक रेस २ ते ५ नोव्हेंबर.

टॅग्स :goaगोवा