शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

विद्यालयातून आदर्श विद्यार्थी शिक्षकच घडवतात: सुभाष शिरोडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:49 AM

गोमंत भूमी सुंदर असून या भूमीतील समाज ही सुंदर असणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क साळ : विद्यालये ही ज्ञानमंदिरे आहेत, ज्यातून विद्यार्थी शिक्षित होऊन समाजाप्रती आदर्श ठरतात. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्याच्या दिशेने वाटचाल करीत राहून नवा समाज घडवण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण होईल. ज्यामुळे नवनिर्मितीची आस मनी बाळगली तर अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे त्यांनी प्रयत्नरत राहावे, असे उद्‌गार येथे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.

अनुसया नवसो कारभाटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या पंधराव्या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात मये येथे सहकार मंत्री शिरोडकर हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते, भटवाडी येथील या कार्यक्रमात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हे खास अतिथी म्हणून, तर प्रमुख वक्ते म्हणून सद्‌गुरु वामनराव पै यांचे शिष्य व जीवन विद्या मिशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पालव, मयेचे सरपंच विद्यानंद कारबोटकर, ट्रस्टचे अध्यक्ष विनायक कारभाटकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

मंत्री शिरोडकर म्हणाले, गोमंत भूमी सुंदर असून या भूमीतील समाज ही सुंदर असणे गरजेचे आहे. व्यसनमुक्त आणि सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शिक्षकांनीही पुढाकार घ्यावा यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवाजीराव पालव यांचे सद्‌गुरु शरणम या विषयांतर्गत व्याख्यान झाले. मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या मये पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आल्या. शिष्यवृत्ती आणि गौरव, बक्षिसे प्रदान सोहळा महामाया हायस्कूल मये, विजयानंद हायस्कूल तिखाजन, पैरा हायस्कूल पैरा यातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

पैरा हायस्कूलला सर्वोत्कृष्ट शाळा

तिन्ही विद्यालयामधून सर्वोत्कृष्ट शाळा हा पुरस्कार पैरा हायस्कूल - पैरा या शाळेने पटकावला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पैरा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप घाटवळ, पैरा स्कूल मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष विष्णू कामत व मॅनेजर संतोष गावकर यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्वोत्कृष्ट शाळा हा पुरस्कार मंत्री शिरोडकर व आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते पैरा हायस्कूलचे मुख्याध्यापक बाळकृष्ण गवस यांनी पुरस्कार स्वीकारला.

 

टॅग्स :goaगोवा